Header Ads

उमरगा : शेतजमीनीवर अतिक्रमन करणाऱ्या भाऊबंदांवर गुन्हा दाखल
पोलीस ठाणे, उमरगा: धन्नु मोतीराम राठोड, वय 65 वर्षे, रा. औराद, ता. उमरगा यांच्या शेतात दि. 26.05.2020 रोजी भाऊबंद- गोविंद व पांडुरंग विठ्ठल राठोड या दोघा भावांनी कडबा, सरपन आनुन टाकले. ते साहित्य काढून घेण्यास धन्नु राठोड यांनी त्यांना वेळोवेळी विनवण्या केल्या. यावर त्यांनी धन्नु यांना शिवीगाळ करुन हे शेत आमच्या मालकीचे असुन साहित्य काढणार नाही. असे धमकावले. अशा मजकुराच्या धन्नु राठोड यांनी दि. 28.08.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 447, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
मारहाण

पोलीस ठाणे, उस्मानाबाद (श.): उमरगा शहरातील बौध्दनगर येथे दि. 27.08.2020 रोजी 19.00 वा. सु. 1)अमर चिलवंत 2)सम्यक चिलवतं 3) पृथ्वीराज चिलवंत 4)सचिन चिलवंत 5)सिद्दोन शिंगाडे 6) रावसाहेब शिंगाडे 7) अक्षय शिंगाडे 8) बुध्दमणी शिंगाडे 9) बंटी शिंगाडे 10) विकी खुणे, सर्व रा. बौध्दनगर, उस्मानाबाद यांच्या गटाचा गल्लीतीलच- 1) राणा बनसोडे 2) राहुल बनसोडे 3) बाळा बनसोडे 4) अजय बनसोडे 5)रोहन बनसोडे 6) रोहित बनसोडे 7) अविनाश बनसोडे 8) समर्थ शिंदे 9) रोहन शिंदे यांच्या गटाशी मागील भांडणावरुन वाद झाला. यात दोन्ही गटांनी एकमेकांस शिवीगाळ करुन तलवार, कुऱ्हाड, लोखंडी गज, फरशी- दगडाने मारहाण करुन गंभीर जखमी केले.
यावरुन दोन्ही गटांतील सदस्यांनी दिलेल्या 2 स्वतंत्र प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 307, 324, 326, 452, 143, 147, 148, 149, 323, 324, 504, 506 सह भारतीय हत्यार कायदा कलम- 4, 25 अन्वये गुन्हे नोंदवले आहेत.

पोलीस ठाणे, उस्मानाबाद (ग्रा.): योगीराज विलास मोरे, रा. समतानगर, उस्मानाबाद व त्यांचा चुलत भाऊ असे दोघे दि. 28.08.2020 रोजी 21.30 वा. सु. कारने येडशी- उस्मानाबाद प्रवास करत होते. दरम्यान येडशी टोलनाका ओलांडताना योगीराज मोरे हे अनावधानाने फास्ट टॅग साठी राखीव असलेल्या टोल बूथवर कार घेउन गेले. त्याकारणावरुन त्यांचा टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांशी वाद झाला यातून टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी योगीराज मोरे यांस्ह त्यांच्या भावास शिवीगाळ करुन लोखंडी गज, काठीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या योगीराज मोरे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 326, 147, 148, 149, 504 अन्वये गुन्हा दि. 29.08.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments