Header Ads

उपचारादरम्यान पलायन करणाऱ्या कोविड- 19 च्या रुग्णावर गुन्हा दाखलपोलीस ठाणे, कळंब: गणेश विष्णु टेकाळे, रा. पिंपळगांव (डोळा), ता. कळंब हे कोविड- 19 संसर्गग्रस्त असल्याने त्यांच्यावर आयटीआय-कळंब येथील कोविड सेंटर मध्ये उपचार चालू होते. उपचारादरम्यान दि. 24.08.2020 रोजी दुपारी ते तेथून परस्पर निघून गेले. अशा प्रकारे त्यांनी निष्काळजीपणाचे कृत्य करुन कोविड- 19 प्रसाराची शक्यता निर्माण केली. यावरुन पोलीस नाईक- भारत पाठक, यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 188, 269 सह महाराष्ट्र कोविड- 19 उपाययोजना नियम- 11 सह आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम- 51 (ब) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

चोरी

पोलीस ठाणे, भुम: अविनाश राम तावरे, रा. गोरमाळा फाटा, ता. भुम यांनी दि. 19.08.2020 रोजी घरासमोर लावलेली होंडा युनिकॉर्न मो.सा. क्र. एम.एच. 13 बीटी 2775 ही मध्यरात्री अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या अविनाश तावरे यांनी दि. 24.08.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.No comments