Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे दोन गुन्हे दाखल
पोलीस ठाणे, नळदुर्ग: राणी राम गायकवाड, रा. दिंडेगांव, ता. तुळजापूर यांसह त्यांचे पती व नातलग- विश्वंभर क्षिरसागर, कलावती क्षिरसागर, सुनिता गायकवाड, लक्ष्मण गायकवाड हे सर्वजण दि. 23.08.2020 रोजी 22.00 वा. आपल्या राहत्या घरी होते. यावेळी गावातील नातेवाईक- महावीर क्षिरसागर, सोपान क्षिरसागर, मारुती क्षिरसागर, कविता क्षिरसागर अशा चौघांनी राणी गायकवाड यांच्या घरी जाउन लग्नासंबंधीच्या वादावरुन नमूद 6 जणांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या राणी गायकवाड यांनी दि. 24.08.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 326, 324, 323, 452, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, शिराढोण: राजेंद्र लोंढे, अशोक लोंढे, सुरज लोंढे, बंटु लोंढे, चौघे रा. लोहटा (प.), ता. कळंब अशा चौघांनी दि. 18.07.2020 रोजी 11.00 वा. सु. हिंगणगावातील समाज मंदीरासमोर मागील भांडणाची कुरापत काढून गयाबाई भिमराव वाघमारे, रा. हिंगणगांव, ता. कळंब यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगड, काठीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या गयाबाई वाघमारे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दि. 24.08.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments