Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे दोन गुन्हे दाखल
भुम: शिवनाथ विठोबा नागरगोजे, रा. तिनखडी, ता. पाथर्डी हे दि. 29.08.2020 रोजी 03.30 वा. सु. भुम तालुक्यातील पार्डी घाटातून पिकअप क्र. एम.एच. 16 सीसी 2494 मधून ईलेक्ट्रॉनिक कॅपॅसिटर बॉक्स घेउन जात होते. दरम्यान घाटरस्त्यामुळे पिकअपची गती कमी झाल्याचा फायदा घेउन अज्ञात चोरट्याने पिकअपचे पाठीमागील टारपोलीन फाडून आतील 33000 एमएफडी 250 व्हीडीसी क्षमतेचे 8 ईलेक्ट्रॉनिक्स कॅपॅसिटर चोरुन नेले. अशा मजकुराच्या शिवनाथ नागरगोजे यांनी दि. 29.08.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


 उस्मानाबाद (ग्रा.): सिताराम दिगंबर भंगे, रा. शिवाजीनगर पुणे हे दि. 28.08.2020 रोजी 20.45 वा. सु. पुणे- मुखेड असा होंडा शाईन मो.सा. क्र. एम.एच. 5826 ने प्रवास करत होते. दरम्यान मौजे येडशी जवळील सम्राट हॉटेलजवळ ते लघुशंकेस थांबले असतांना दोन अनोळखी व्यक्तीं तेथे आल्या. त्यातील एकाने सागर असे नाव सांगुण मोबाईल फोन कॉल करण्याचा बहाण्याने सिताराम भंगे यांचा मोबाईल फोन मागून घेतला. फोन हाती येताच त्या दोघांनी बाजूस उभी असलेली सिताराम भंगे यांची मोटारसायकल पळवून घेउन गेले. अशा मजकुराच्या सिताराम भंगे यांनी दि. 29.08.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

No comments