Header Ads

हुंडाबळी: सात व्यक्तींवर गुन्हा दाखल

 उस्मानाबाद (ग्रा.): शिल्पा अनंतकुमार लांडगे, वय 30 वर्षे, रा. काजळा, ता. उस्मानाबाद यांनी दि. 06.07.2020 रोजी आत्महत्या केली. वाहन खरेदीसाठी शिल्पा यांनी माहेरहुन 6 लाख रुपये आणावे असा तगादा सासरकडील लोक- आनंदकुमार लांडगे (पती), विलास लांडगे (सासरा), प्रमिला (सासु), दिपक व सुधीर (दिर), हर्षदा व प्रतिभा (जावा) यांनी लावला होता. त्याकरीता नमूद लोक शिल्पा हिचा सन- 2012 पासुन वेळोवेळी शारिरीक- मानसिक छळ करत होते. सतत होणाऱ्या या छळाला कंटाळुन शिल्पा यांनी आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या सुमित अरुण रणखांब, रा. अजिंठानगर, उस्मानाबाद यांच्या प्रथम खबरेवरुन नमूद 7 व्यक्तींविरुध्द भा.दं.सं. कलम- 306, 304 (ब), 498 (अ), 323, 504, 34 अन्वये गुन्हा दि. 07.08.2020 रोजी नोंदवला आहे.

मारहाण

पोलीस ठाणे, परंडा: बाबु माणिक बोबडे, रा. शिरसाव, ता. परंडा यांच्या शेतबांधावरील लिंबाचे झाड वाऱ्याने मोडून शेतशेजारी- सुनिल बाळासाहेब पाटील यांच्या शेतातील पिकावर पडून पिकाचे नुकसान झाले होते. याचा राग मनात धरुन दि. 05.08.2020 रोजी 19.30 वा. सु. बाबु बोबडे हे सुनिल पाटील यांच्या घरा समोरुन जात असतांना सुनिल पाटील व प्रियंका पाटील या दोघांनी बाबु बोबडे यांना शिवीगाळ करुन, लोखंडी गजाने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या बाबु बोबडे यांच्या फिर्यादीवरुन नमूद दोघांविरुध्द गुन्हा दि. 06.08.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments