अपघातात एक मयत तर हाणामारीत एक जखमी 
पोलीस ठाणे, बेंबळी: राजासाहेब नजीर रोजेवाले, वय 35 वर्षे, रा. लामजना, ता. औसा यांनी दि. 29.07.2020 रोजी मो.सा. क्र. एम.एच. 25 एआर 3241 ही मौजे समुद्रवाणी, ता. उस्मानाबाद येथील तेरणा नदीच्या पुलाजवळ निष्काळजीपणे चालवली. यामुळे मो.सा. वर पाठीमागे बसलेले फिरोज जब्बार शेख, रा. काटी, ता. तुळजापूर हे खाली पडल्याने गंभीर जखमी होउन उपचारादरम्यान मयत झाले. अशा मजकुराच्या मुदस्सर चाँद शेख, रा. काटी यांनी आकस्मात मृत्युच्या चौकशीत दिलेल्या जबाबावरुन फिरोज शेख यांच्याविरुध्द भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184 अन्वये गुन्हा दि. 01.08.2020 रोजी नोंदवला आहे.

मारहाण.
पोलीस ठाणे, वाशी: राजेंद्र संदिपान बोरकर, रा. पिंपळगाव (लिंगी), ता. वाशी यांना तु आमच्या शेतात का फिरतोस. असे धमकावून भाऊबंद- बालाजी विश्वंभर बोरकर, विश्वंभर बोरकर, पद्मीनबाई बोरकर अशा तीघांनी दि. 02.08.2020 रोजी 09.30 वा. सु. मौजे पिंपळगाव (लिंगी) येथील शेत शिवारात राजेंद्र बोरकर यांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, दगड- काठीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या राजेंद्र बोरकर यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद तीघांविरुध्द गुन्हा नोंदवला आहे.

No comments