Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यत दोन अपघात, एक हाणामारीची घटना येरमाळा: महेश राजाभाऊ शेटे, रा. वडगाव (ज.), ता. कळंब हे दि. 10.07.2020 रोजी 10.30 वा. सु. वडगाव (ज.) फाटा जवळील रस्त्याने पायी जालत जात होते. यावेळी पिक अप क्र. एम.एच. 25 एजे 1136 या वाहनाने महेश शेटे यांना पाठीमागुन धडक दिल्याने ते गंभीर जखमी होउन मयत झाले. अपघातानंतर जखमीस वैद्यकीय उपचारकामी न नेता, अपघाताची खबर पोलीसांना न नमूद वाहनाचा अज्ञात चालक घटनास्थळावरुन निघुन गेला. अशा मजकुराच्या राजाभाऊ मनोहर शेटे (मयताचे वडील) यांनी दि. 12.08.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 134 (अ)(ब) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 तामलवाडी: कोविड- 19 च्या अनुशंगाने पो.ठा. तामलवाडी येथील चेक पोस्टवर पोलीस पथक आज दि. 13.08.2020 रोजी 00.05 वा. सु. पोलीस पथक चेक पोस्टवरील वाहनांची तपासणी करत होते. यावेळी पोलीस तपासणीस टाळून विनापरवाना परस्पर निघून जाण्याच्या प्रयत्नात वाहन क्र. एम.एच. 12 ईएम 6449 चे चालक- संदीप सज्जन देशमुख, रा. पुणे यांनी पोलीस अडथळ्यांना धडक दिल्याने अडथळे मोडून त्याचे आर्थिक नुकसान झाले आहे. यावरुन पोकॉ- अनिल मोरे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 188, 279 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


हाणामारी 

 उमरगा: अमोल दिगंबर भोसले, रा. हिप्परगाराव, ता. उमरगा हे मित्रासह दि. 12.08.2020 रोजी 14.30 वा. सु. गावातील चौकात थांबले होते. यावेळी 1) अमोल खवडे 2)सतिश खवडे 3)प्रविण यंपाळे 4) यल्लप्पा यंपाळे 5)अंकुश यंपाळे 6)विजय भांगे 7)नवनाथ भांगे, सर्व रा. हिप्परगाराववाडी यांनी त्या ठिकाणी येउन पुर्वीच्या भांडणाची कुरापत काढून अमोल भोसले यांसह त्यांच्या मित्रास शिवीगाळ करुन हंटरने, दगडाने मारहाण करुन जखमी केले. तसेच अमोल भासले यांच्या मो.सा. वर दगड मारुन नुकसान केले. अशा मजकुराच्या अमोल भोसले यानी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद 7 व्यक्तींविरुध्द भा.दं.सं. कलम- 143, 147, 148, 149, 323, 427, 504 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

No comments