Header Ads

घरफोडीच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी अटकेत
स्थानिक गुन्हे शाखा: वाशी पो.ठा. गु.र.क्र. 30 /2019 या रात्रीच्या घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी- सुभाष शिवा शिंदे, रा. पारधी पिढी, इंदीरानगर, पारा, ता. वाशी हा पोलीसांना तपासकामी हवा होता. गोपनीय स्था.गु.शा. च्या सपोनि- श्री. आशिष खांडेकर, सपोफौ- मधुकर घायाळ, पोहेकॉ- तानाजी माळी, भागवत झोंबाडे, धनंजय कवडे, पोना- समाधान वाघमारे यांच्या पथकाने खबरेच्या आधारे त्यास दि. 27.08.2020 रोजी इंदीरानगर परिसरातून ताब्यात घेउन वाशी पो.ठा. यांच्या ताब्यात दिले आहे.


म्हशीचा मृत्यु, संशयीतावर गुन्हा दाखल

पोलीस ठाणे, उमरगा: संदेश मारेकर, रा. माडज, ता. उमरगा यांची म्हैस दि. 22.08.2020 रोजी माडज येथील शेतात मेली. संदेश मारेकर यांचा गावातीलच- वामन, बाबु, रोहित या गायकवाड कुटूंबीयांशी जुना वाद आहे. त्या वादातून नमूद तीघांनी त्या म्हशीस विषप्रयोगाने ठार मारले असण्याचा संशय आहे. अशा मजकुराच्या संदेश मारेकर यांनी दि. 27.08.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 429, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

मारहाण


पोलीस ठाणे, उस्मानाबाद (श.): सुसेन गोरे, रा. बार्शी नाका, उस्मानाबाद यांचे शहरातील काळा मारुती परिसरात फुले विक्रीचे दुकान आहे. हा व्यवसाय सुरळीत चालू ठेवायचा असेल तर मला 2,000/-रु. हप्ता द्यावा लागेल. अशी खंडणीची धमकी बबन काकडे, रा. उस्मानाबाद हा त्यांना देत असे. त्याच्या या धमकीस सुसेन गोरे कधीही बळी पडले नाही. सुसेन गोरे हे दि. 27.08.2020 रोजी दुकानातून घरी जात असतांना गाडगेबाबा चौकात बबन काकडे याने त्यांना अडवून खंडणी देत नसल्याच्या कारणावरुन मारहाण केली. अशा मजकुराच्या सुसेन गोरे यांनी दि. 27.08.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 384, 324, 341, 504, 506 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

अपघात

पोलीस ठाणे, वाशी: तुकाराम नागनाथ धोत्रे, रा. सावरगाव, ता. तुळजापूर हे पत्नी- सावित्रा धोत्रे यांसह मो.सा. क्र. एम.एच. 13 डीबी 8722 ने दि. 31.07.2020 रोजी 03.30 वा. सु. पाथरी- सोलापुर असा प्रवास करत होते. दरम्यान वाशी तालुक्यातील इंदापूर फाटा येथे तुकाराम धोत्रे यांनी मोटारसायक निष्काळजीपणे चालवून ती अनियंत्रीत झाल्याने घसरली. या अपघातात तुकाराम धोत्रे हे मयत झाले तर सावित्रा धात्रे या गंभीर जखमी झाल्या. अशा मजकुराच्या गणेश तुकाराम धोत्रे (मयताचा मुलगा) यांनी दि. 28.08.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 338, 304 (अ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


No comments