Header Ads

ढोकी : 3 वर्षापुर्वी चोरीस गेलेला मोबाईल फोनसह संशयीत महिला ताब्यात
ढोकी  - विवो कंपनीचा 11,500 ₹ किंमतीचा मोबाईल फोन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्यावरुन पो.ठा. ढोकी येथे गु.र.क्र. 183/2017 हा दाखल आहे. अशा चोरीस गेलेल्या फोनचा ऑनलाईन शोध घेण्याचे काम सायबर पोलीस ठाणे नियमीतपणे करत असते. याच दरम्यान सायबर पो.ठा. यांच्या पथकास समजले की नमूद मोबाईल फोन हा खॉजानगर, उस्मानाबाद येथील मेहरुन्नीसा रसुल तांबोळी, वय 60 वर्षे यांच्या ताब्यात आहे. यावरुन स्था.गु.शा. च्या पथकाने आज दि. 06.08.2020 रोजी नमूद महिलेस ताब्यात घेउन त्यांच्या ताब्यातून नमूद मोबाईल फोन जप्त केला. तसेच उर्वरीत कार्यवाहीस्तव त्यांस पो.ठा. ढोकी च्या ताब्यात दिले आहे.


ही कारवाई स्था.गु.शा. चे पो.नि. दगुभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली यायबर पो.ठा. चे सपोनि- श्री. सचिन पंडीत, स्था.गु.शा. चे सपोनि- आशिष खांडेकरसपोफौ- मधुकर घायाळ, पोहेकॉ- तानाजी माळी, भागवत झोंबाडे, पोना- समाधान वाघमारे, संतोष गव्हाणे, पोकॉ- मनोज मोरे, महिला पोकॉ- होळकर यांच्या पथकाने केली आहे.No comments