Header Ads

चोरीच्या दागिन्यांसह मोबाईल फोन जप्त, आरोपी अटकेतस्थानिक गुन्हे शाखा: पो.ठा. परंडा गु.र.क्र. 205 / 2020 या दरोड्याच्या गुन्ह्यातील चोरीस गेलेले सोन्याचे दागिने व सॅमसंग मोबाईल फोन असा एकुण 18,935/-रु. चा मुद्देमालासह आरोपी- आप्पा सोपान काळे, वय 55 वर्षे, रा. भुम यास दि. 18.08.2020 रोजी स्था.गु.शा. च्या पोउपनि श्री. पांडुरंग माने, पोहेकॉ- किसन जगताप, थोरात, पोना- हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, पोकॉ- अविनाश मारलापल्ले, सर्जे यांच्या पथकाने ताब्यात घेउन उर्वरीत कार्यववाहीस्तव पो.ठा. परंडा यांच्या ताब्यात दिले आहे.

चोरी.
पोलीस ठाणे, नळदुर्ग: सुनिल हिराचंद कंदले, रा. सोनार गल्ली, अणदुर, ता. तुळजापूर यांच्या राहत्या घराचे कुलूप अज्ञात चोरट्याने दि. 17.08.2020 रोजी मध्यरात्री तोडून घरातील 58 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व 5 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असा एकुण 1,82,500/-रु. चा माल चोरुन नेला.

तर दुसऱ्या घटनेत आदिनाथ धुळाप्पा बागडे, रा. इटकळ, ता. तुळजापूर यांच्या ‘श्रध्दा साडी सेंटर’ या दुकानाचे शटर अज्ञात चोरट्याने दि. 19.08.2020 रोजी 01.00 ते 04.00 वा. चे दरम्यान उचकटुन आतील साड्या, कपडे (एकुण किं.अं. 69,000/-रु.) चोरुन नेला. तसेच शेजारील जाधव मेडीकल्स & स्टोअर्स व अलमदिना गॅस सर्विस या दुकानांचे शटर उचकटुन चोरीचा प्रयत्न केला.

अशा मजकुराच्या नमूद दोन्ही गुन्ह्यातील फिर्यादींनी दि. 18.08.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अन्वये 2 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

No comments