Header Ads

धाक दाखवून लोकसेवकांच्या कर्तव्यात अडथळा, दोन गुन्हे दाखल


उस्मानाबाद (श.): महावितरण शहर शाखा-3 चे तंत्रज्ञ- प्रशांत टिंगरे व लाईनमन- नितीन लोहार हे दि. 19.08.2020 रोजी 14.00 वा. शहराजवळील साळुंकेनगर परिसरातील वीज वितरण पेटीचा (डीपी) फ्युज बसवून परतत होते. दरम्यान बाबु कदम, जिवन कदम व अन्य एका अनोळखी पुरुषाने त्यांची मोटारसायकल अडवून चावी काढून घेउन ‘तुम्ही आमच्या शेतातून का आलात’ असे टिंगरे व लोहारा यांना धमकावून शिवीगाळ करुन काठी- ठिबक सिंचन नळीने मारहाण केली. अशा मजकुराच्या प्रशांत टिंगरे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 353, 332, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


पोलीस ठाणे, कळंब: पंचायत समिती, कळंब येथील कृषी अधिकारी- विरेश अंधारी हे दि. 19.08.2020 रोजी 13.15 वा. पंचायत समिती कार्यालयात होते. यावेळी बाळासाहेब संदीपान टेकाळे उर्फ कल्याण, रा. पिंपळगांव (होळी), ता. कळंब यांनी तेथे येउन वृक्ष लागवड कामाच्या संदर्भाने विरेश यांच्याशी वाद घालून त्यांच्या अंगावर धावून जाउन, अश्लील हावभाव- शिवीगाळ करुन शासकीय कामात अडथळा निर्माण केला. अशा मजकुराच्या विरेश अंधारी यांनी दि. 20.08.2020 दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 353, 294, 504 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 

No comments