Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल
उस्मानाबाद - रविंद्र अंबादास शिनगारे, रा. दत्तनगर, कळंब यांनी दि. 28.08.2020 रोजी 14.00 वा. सु. उस्मानाबाद शहरातील माउली फोटो लॅब समोर स्प्लेंडर प्लस मो.सा. क्र. एम.एच. 44 एल 1720 ही लावलेली असतांना अज्ञात चोरट्याने चोरुन नेली. अशा मजकुराच्या रविंद्र शिनगारे यांनी दि. 28.08.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


 तुळजापूर: सागर किशोर सावंत, रा. मंगरुळ, ता. तुळजापूर यांच्या तुळजापूर येथील ‘रुद्रा किराणा दुकान’ चा मागील बाजूचा पत्रा अज्ञात चारेट्याने दि. 29.08.2020 रोजी मध्यरात्री उचकटून- कापून दुकानातील साबन, खाद्यतेल, तांदुळ 3 कट्टे, गुळ 20 कि.ग्रॅ. इत्यादी साहित्य एकुण किं.अं. 37,090/-रु. चा माल व रोख रक्कम 2,500/-रु. व सीसीटीव्ही कॅमेरा रेकॉर्डर बॉक्स चोरुन नेला. अशा मजकुराच्या सागर सावंत यांनी दि. 30.08.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


उस्मानाबाद : ज्योतीराम बलभीम रणदिवे, वय 55 वर्षे, रा. सारोळा, ता. उस्मानाबाद हे दि. 30.08.2020 रोजी रात्री सारोळा येथील आपल्या शेत गट क्र. 412 मधील गोठ्यात झोपले होते. मध्यरात्री 00.57 वा. सु. अनोळखी चार व्यक्तींनी त्या ठिकाणी येउन ज्योतीराम रणदिवे यांचा मोबाईल फोन हिसकावून घेतला. त्यानंतर चोरांनी त्यांचे हात- पाय- तोंड दोरी- गमजाने बांधून त्यांना काठीने मारहाण करुन शेतातील 2 चंदनाची झाडे कापून चोरुन नेली. तसेच शेजारील शेतकरी- गौतम राजाराम रणदिवे यांच्याही शेतातील 1 चंदनाचे झाड कापून चोरुन नेले. अशा मजकुराच्या ज्योतीराम रणदिवे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 394, 34 अन्वये गुन्हा दि. 30.08.2020 रोजी नोंदवला आहे.

चोरीच्या गुन्ह्यात 3 वर्षांपासुन पाहिजे (Wanted) असलेला आरोपी अटकेत

स्थानिक गुन्हे शाखा: पो.ठा. परंडा गु.र.क्र. 119 / 2017 या चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी- सुनिल परमेश्वर शिंदे, वय 22 वर्षे, रा. पिंपरी (जेबा), ता. नेकनुर, जि. बीड हा गेली 3 वर्षे पोलीसांना हवा होता. त्याचा निश्चित ठावठिकाणा समजून येत नव्हता. त्यास स्था.गु.शा. च्या सपोनि- श्री. आशिष खांडेकर, सपोफौ- मधुकर घायाळ, तानाजी माळी, भागवत झोंबाडे, धनंजय कवडे, पोना- समाधान वाघमारे, महेश घुगे यांच्या पथकाने दि. 29.08.2020 रोजी परंडा शिवारातून ताब्यात घेउन पो.ठा. परंडा यांच्या ताब्यात दिले आहे.

No comments