Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखलपोलीस ठाणे, उमरगा: विजयाबाई दत्तात्रय माने, रा. प्रगतीनगर, उमरगा यांच्या राहत्या घराचा कडी- कोयंडा अज्ञात चोरट्याने दि. 25.08.2020 ते 27.08.2020 या कालावधीत तोडून घरातील सोने- चांदीचे दागिने किं.अं. 38,250/-रु. चे व रोख रक्कम 4,000/-रु. चोरुन नेले आहेत. अशा मजकुराच्या विजयाबाई माने यांनी दि. 27.08.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 454, 457, 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, आनंदनगर: भैरवनाथ संभाजी काळे, रा. कोर्ट कॉलनी, सांजा रोड, उस्मानाबाद यांच्या राहत्या घराचा कडी- कोयंडा अज्ञात चोरट्याने दि. 26.08.2020 रोजी मध्यरात्री तोडून घरातील कॅनॉन कंपनीचा कॅमेरा, सॅमसंग जे-7 मोबाईल फोन, चांदीचे दागिने व रोख रक्कम 6,000/-रु. चा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या भैरवनाथ काळे यांनी दि. 28.08.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, कळंब: मकरध्वज बालाजी सुर्यवंशी, रा. ढोकी नाका, कळंब यांनी दि. 26.08.2020 रोजी ढोकी नाका डिकसळ येथे लावलेली टिव्हीएस ॲपाचे मो.सा. क्र. एम.एच. 25 सी 4499 ही मध्यरात्री अज्ञात चोरट्याने चोरुन नेली. अशा मजकुराच्या मकरध्वज सुर्यवंशी यांनी दि. 28.08.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

No comments