अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रक जप्त
स्थानिक गुन्हे शाखा: स्था.गु.शा. चे पोउपनि- श्री पांडुरंग माने यांच्यासह पोहेकॉ- प्रमोद थोरात, पोना- हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, पोकॉ- अविनाश मारलापल्ले यांचे पथक दि. 02.07.2020 रोजी पो.ठा. वाशी हद्दीत रात्र गस्त करत होते. गस्ती दरम्यान चालक- उमेश आभीमान भालेकर व त्याचा सहायक- पंडीत हरिभाऊ जाधव, दोघे रा. येळंब, ता. बीड हे ट्रक क्र. एम.एच. 12 एनएक्स 7609 मधून सुमारे 7 ब्रास वाळु (गौण खनिज) विनापरवाना वाहुन नेत असतांना आढळले. यावरुन पथकाने तो ट्रक जप्त करुन वाशी पो.ठा. च्या ताब्यात दिला असुन पुढील कारवाई ही महसूल प्रशासनाशी संपर्क साधून केली जाणार आहे. No comments