Header Ads

आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या सासरकडील लोकांवर गुन्हा दाखल
 भुम: पुनम रवि पवार, वय 20 वर्षे, रा. समर्थनगर, भुम यांनी दि. 23.08.2020 रोजी फाशी घेउन आत्महत्या केली. वाहन खरेदीसाठी पुनम यांनी माहेरहुन पैसे आणावे असा तगादा सासरकडील लोक- रवि दिलीप पवार (पती), कविता पवार (सासु), दिलीप पवार (सासरा) यांनी लावला होता. त्याकरीता नमूद लोक पुनम हिचा वेळोवेळी शारिरीक- मानसिक छळ करत होते. सतत होणाऱ्या या छळाला कंटाळुन शिल्पा यांनी आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या संजय नारायण जाधव, रा. ईटकुर, ता. कळंब यांनी अकस्मात मृत्यु क्र. 31/2020 च्या चौकशीत दिलेल्या निवेदनावरुन नमूद 3 व्यक्तींविरुध्द भा.दं.सं. कलम- 306, 498 (अ), 323, 504, 34 अन्वये गुन्हा दि. 23.08.2020 रोजी नोंदवला आहे.

मारहाण.
 तामलवाडी: तुकाराम बळीराम शिंदे, रा. मसला (खु.), ता. तुळजापूर हे कुटूंबीयांसह दि. 23.08.2020 रोजी 10.00 वा. सु. गावातील आपल्या शेतात पेरणी करत होते. यावेळी भाऊबंद- 1)नानासाहेब शिंदे 2)गजेंद्र शिंदे 3)दिनकर शिंदे 4)संकेत शिंदे 5)सुजाता शिंदे या सर्वांनी शेतजमीनीच्या मालकीच्या कारणावरुन तुकारम शिंदे यांसह त्यांच्या पत्नी, मुलास शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या तुकाराम शिंदे यांनी दि. 23.08.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द भा.दं.सं. कलम- 143, 147, 149, 323, 504 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

No comments