Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे दोन गुन्हे दाखल मुरुम: अज्ञात चोरट्याने दि 17.08.2020 रोजी मध्यरात्री सुरेश शंकर बोळदे, रा. आलुर, ता. उमरगा यांच्या मौजे आलुर येथील शेतातील घराच्या भिंतीवरुन घरात प्रवेश करुन घरातील रोख रक्कम 30,000/-रु., सॅमसंग जे- 7 व नोकीया असे दोन मोबाईल फोन चोरुन नेले. अशा मजकुराच्या सुरेश बोळदे यांनी दि. 17.08.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 बेंबळी: हनुमंत सोमनाथ शिंदे, रा. बामणी (वाडी), ता. उस्मानाबाद यांनी त्यांची होंडा शाईन मो.सा. क्र. एम.एच. 25 एपी 9287 ही दि. 16.08.2020 रोजी मध्यरात्री आपल्या घरासमोर लावली होती. ती अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या हनुमंत शिंदे यांनी दि. 18.08.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


अपघात

 येरमाळा: चालक- गणेश अश्रुबा हुंबे, रा. पांढरेवाडी, ता. भुम यांनी दि. 17.08.2020 रोजी 10.15 वा. सु. वॅगन आर कार क्र. एम.एच. 14 जीयु 7501 ही तेरखेडा येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 वरील उड्डानपुलाजवळ निष्काळजीपणे, हयगईने चालवून पलटल्याने कारचे नुकसान झाले. यावरुन पोलीसांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद कार चालकाविरुध्द भा.दं.स. कलम- 279 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                   No comments