Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात मारहाणीचे दोन गुन्हे दाखलउमरगा: उमरगा शहरातील ओंकार मोटार गॅरेज समोर दि. 17.08.2020 रोजी 09.30 वा. सु. 1)समीर सरदार काझी 2)सरदार काझी 3) बबलू काझी, रा. येळी  ह.मु. न्यु गणेश नगर, उमरगा यांचा गावातीलच- अब्दुल रशीद शेख यांच्याशी मागील भांडणावरुन वाद झाला. यात दोन्ही पक्षांनी एकमेकांस शिवीगाळ करुन कत्ती, काठीने मारहाण करुन जखमी केले. यावरुन दोन्ही पक्षांनी दिलेल्या 2 स्वतंत्र प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 323, 324, 504, 506 अन्वये गुन्हे नोंदवले आहेत.

 आंबी: राम विठ्ठल झांबरे, वय 31 वर्षे, रा. खंडेश्वरवाडी, ता. परंडा हे दि. 15.08.2020 रोजी 11.00 वा. गावातीलच आपल्या शेतात होते. यावेळी गावातीलच सुरवसे कुटूंबातील- गणेश, सुरेश, विकास, बाळु, सुग्रीव, सुष्मा, दीदी, संगीता यांसह चोवीस व्यक्तींनी तुरीच्या पिकाच्या नुकसानीच्या कारणावरुन राम झांबरे यांना कुऱ्हाडीने, काठी- दगडाने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या राम झांबरे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 323, 324, 147, 148, 149 सह म.पो.का. कलम- 135 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

No comments