Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात दोन अपघात, एक मयत, एक जखमी

पोलीस ठाणे, शिराढोण: चालक- ज्ञानेश्वर बसंतरावजी दर्गे, रा. सिडको नांदेड, ता. नांदेड यांनी दि. 24.08.2020 रोजी 17.30 वा. सु. ढोकी- मुरुड या राज्य मार्ग- 77 वर बस क्र. एम.एच. 13 सीयु 6934 ही निष्काळजीपणे चालवून मुदतसर सरताज मशायक, वय 25 वर्षे, रा. ढोकी, ता. उस्मानाबाद हे चालवत असलेल्या मो.सा. क्र. एम.एच. 25 सी 2143 ला समोरुन धडक दिली. या अपघातात मुदतसर मशायक हे गंभीर जखमी होउन मयत झाले. अशा मजकुराच्या मुस्ताफा सरताज मशायक (मयताचा भाऊ) यांनी दि. 25.08.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, मुरुम: चालक- सलीम अन्सारी, रा. गादी, जि. कोडरमा, राज्य- झारखंड याने दि. 24.08.2020 रोजी 14.45 वा. सु. ट्रक क्र. आर.जे. 14 जीडी 5869 हा मौजे कोराळ मोडजवळ राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 वर निष्काळजीपणे चालवून मोटारसायकला धडक दिली. यात मो.सा. वरील राजेंद्र फुगटे, रा. मुरुम व लालासाहेब वाघमारे, दोघे रा. माकणी हे गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या राजेंद्र फुगटे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184 अन्वये गुन्हा दि. 25.08.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments