Header Ads

सोशल मीडियावरून कळंबच्या तरुणाचे मुंबईच्या महिलेशी ओळख

              तिच्यासाठी तो मुंबईला गेला पण परत न आल्याने पोलीस स्टेशनमध्ये  तक्रार दाखल कळंब: सोशल मीडियावरून कळंबच्या एका तरुणाचे मुंबईच्या एका महिलेशी ओळख झाली, त्यानंतर तिच्यासाठी तो मुंबईला गेला पण परत न आल्याने कुटुंबाने पोलीस स्टेशनमध्ये  तक्रार दाखल केली आहे.

मुंबई येथे राहणाऱ्या 30 वर्षीय महिलेने कळंब येथील एका 17 वर्षीय तरुणाशी (नाव- गाव गोपनीय) इन्स्टाग्राम, व्हाट्सॲप द्वारे ओळख परिचय वाढवून त्यास मुंबई येथे बोलावले. यावर तो तरुण दि. 25.08.2020 रोजी कळंब येथून मुंबईस निघून गेला. त्याची पुन्हा काही माहिती कुटूंबीयांना मिळाली नाही. यावरुन त्या महिलेनेच त्याचे अपहरण केले आहे. अशा मजकुराच्या अपहृत मुलाच्या वडलांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363 अन्वये गुन्हा दि. 29.08.2020 रोजी नोंदवला आहे.

मारहाण

 उस्मानाबाद (ग्रा.): चंद्रकला अर्जुन कानडे, रा. वरुडा, ता. उस्मानाबाद यांसह त्यांचे दिर, पुतण्या- लालासाहेब यांना दि. 26.08.2020 रोजी सायंकाळी राहत्या घरासमोर गावकरी- दिपक काळे, नामदेव कानडे, विशाल गाढवे यांसह 6 व्यक्तींनी जुन्या वादावरुन शिवीगाळ करुन, काठी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या चंद्रकला यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन दि. 29.08.2020 रोजी गुन्हा नोंदवला आहे.

No comments