Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे दोन गुन्हे दाखलउस्मानाबाद - प्रदिप हनुमंत पाटील, रा. गोलेगाव, ता. वाशी हे दि. 10.05.2020 रोजी 07.30 वा. सु. शेत गट क्र. 187 मध्ये काम करत होते. यावेळी भाऊबंद- दिलीप हनुमंत पाटील, शारदा पाटील, दिग्वीजय पाटील अशा तीघांनी शेतमालकीच्या कारणावरुन प्रदिप पाटील यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. यात प्रदिप पाटील यांच्या नाकाचे हाड मोडले. अशा मजकुराच्या प्रदिप पाटील यांनी दि. 26.08.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 325, 323,504,506,34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


उस्मानाबाद - मुलीला सासरी न नांदवण्याच्या कारणावरुन सांजा, ता. उस्मानाबाद येथील सुर्यकांत संभाजी दाभाडे यांसह कुटूंबीय व काकानगर, उस्मानाबाद येथील अंगद किसन गायकवाड यांसह कुटूंबीय या दोन्ही गटांत दि. 25.08.2020 रोजी रात्री 10.00 वा. मौजे सांजा गावात भांडणे झाली. यात दोन्ही गटांनी परस्परविरोधी सदस्यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण केली.

       अशा मजकुराच्या दोन्ही गटांनी दिलेल्या 2 स्वतंत्र प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हे नोंदवले आहेत.

No comments