Header Ads

लोहारा ; होम क्वारंटाईन व्यक्तीचा सार्वजनिक वावर, डॉक्टरांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखललोहारा: कोरोनावर उपचार झाल्यानंतर होम क्वारंटाईन करण्यात आलेल्या व्यक्तीने  सार्वजनिक ठिकाणी वावर केल्याने डॉक्टरांच्या तक्रारीवरुन पोलीस स्टेशनमध्ये  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोग्य सेवक- रविकुमार बाळु मोकाशे, रा. लोहारा हे कोविड- 19 संसर्गग्रस्त आढळल्याने त्यांच्यावर दि. 14 ते 25.08.2020 या काळात उपजिल्हा रुग्णालय, तुळजापूर येथे उपचार करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांना पुढील दहा दिवस होम क्वारंटाईन राहण्यास सांगीतले असतांनाही ते दि. 26.08.2020 रोजी 08.00 वा. सु. लोहारा शहरात सार्वननिक ठिकाणी फिरले. अशा प्रकारे त्यांनी निष्काळजीपणाचे कृत्य करुन कोविड- 19 प्रसाराची शक्यता निर्माण केली. यावरुन आरोग्य अधिकारी- डॉ. अशोक कठारे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 188, 269 सह महाराष्ट्र कोविड- 19 उपाययोजना नियम- 11 सह आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम- 51 (ब) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

चोरी

पोलीस ठाणे, नळदुर्ग: अभिजीत विजयकुमार बोधणे, रा. सलगरा (दि.), ता. तुळजापूर यांनी टीव्हीएस स्टार सिटी मो.सा. क्र. 13 7589 ही दि. 27.08.2020 रोजी आपल्या घरा समोर लावली असतांना मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने चोरुन नेली. अशा मजकुराच्या अभिजीत बोधणे यांनी दि. 29.08.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

No comments