Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे दोन गुन्हे दाखलभुम: भुम तालुक्यातील मौजे हिवर्डा येथील खंडोब मंदीराजवळ गावातील मुंडे कुटूंबातील बाळु, नात्याबा, रामभाऊ, अर्जुन, शांतिलाल, अजिनाथ, नामदेव, विजय, तानाजी, प्रभाकर, बाबु, सोनु, बिभीषण शिवाजी कांदे यांच्या गटाचा दुसऱ्या मुंडे कुटूंबीयांतील- दत्ता, अनिल, ताई, शिवलींग, संदीपान, वसंत, भाऊसाहेब, शालनबाई, सुनिल, विठ्ठल रामभाऊ मुंडे यांच्या गटाशी मागील भांडणाच्या कारणावरुन वाद झाला. यात दोन्ही गटांनी परस्परविरोधी गटांतील सदस्यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठी, वायरने मारहाण करुन जखमी केले.अशा मजकुराच्या दोन्ही गटांनी परस्परविरोधी दिलेल्या 2 प्रथम खबरेवरुन दि. 30.08.2020 रोजी गुन्हा नोंदवला आहे.


उस्मानाबाद (ग्रा.): दिपक काळे, रा. वरुडा, ता. उस्मानाबाद हे दि. 26.08.2020 रोजी 18.00 वा. सु. गावातील आपल्या बहिणीच्या घरी गेले होते. यावेळी गावातील अर्जुन कानडे यांच्यासह कुटूंबातील- चंद्रकला, अंजली, रुक्मीणी, लालासाहेब, गणेश, किरण अशा सर्वांनी “तु आमच्या गल्लीत का आलास?” असे दिपक काळे यांना धमकावून शिवीगाळ करुन काठी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या दिपक काळे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद आरोपींविरुध्द दि. 30.08.2020 रोजी गुन्हा नोंदवला आहे.

No comments