Header Ads

उस्मानाबाद : कोविड- 19 रुग्णाचे उपचारादरम्यान पलायन, गुन्हा दाखलपोलीस ठाणे, उस्मानाबाद (श.): कोविड- 19 संसर्ग बाधीत गंगाधर शाम गिरी, वय 70 वर्षे, रा. पिंपळगांव (डो.), ता. कळंब यांचा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार चालू होता. दि. 15.08.2020 रोजी सकाळी 09.30 वा. सु. ते तेथून परस्पर निघून गेले. अशा तऱ्हेने त्यांनी कोविड- 19 संसर्ग पसरवण्याची शक्यता निर्माण करण्याचा गुन्हा केल्याने त्यांच्याविरुध्द रुग्णालय परिसेवक- रउफ शेख यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो.ठा. उस्मानाबाद (श.) येथे भा.दं.सं. कलम 188, 269 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


मनाई आदेश झुगारुन विनापरवाना प्रवास केला, गुन्हा दाखल

पोलीस ठाणे, आनंदनगर: कोविड- 19 च्या प्रसारास प्रतिबंध व्हावा या उद्देशाने विविध मनाई आदेश अंमलात आहेत. त्या मनाई आदेशाचे उल्लंघन करुन उस्मानाबाद परिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल- विजय मोहनराव दौंड यांनी यांनी दि. 17.04.2020 रोजी 19.20 वा. सु. स्विफ्ट डिझायर क्र. एम.एच. 33 ए 4623 ने उस्मानाबाद- लातूर असा विनापरवाना प्रवास केला. अशा प्रकारे त्यांनी कोविड- 19 संसर्ग पसरण्याच्या शक्यतेचे घातक कृत्य केले. यावरुन सहायक वनसंरक्षक- प्रकाश बाबासाहेब बारस्कर यांनी दि. 14.08.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन  भा.दं.सं. कलम- 188, 269, 271 सह कोविड- 19 उपाययोजना नियम- 11 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.No comments