Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात दोन अपघातात दोन मयतमुरुम: बाबुराव सिद्रमअप्पा ढाले, वय 67 वर्षे, रा. शास्त्रीनगर, मुरुम हे दि. 25.08.2020 रोजी 08.45 वा. सु. बेनितुरा कॉलनीजवळ लक्ष्मी मंदीरासमोरील रस्त्यावर मो.सा. क्र. एम.एच. 25 एएफ 9432 ही चालवत जात होते. यावेळी महेश मोहन घाटे, रा. गुंजोटी, ता. उमरगा यांनी बुलेट मो.सा. क्र. एम.एच. एएफ 5647 ही निष्काळजीपणे चालवून बाबुराव ढाले यांच्या मोटारसायकलला जोराची धडक दिली. या अपघातात बाबुराव ढाले हे गंभीर जखमी होउन मयत झाले. अशा मजकुराच्या सोमेश्वर बाबुराव ढाले (मयताचा मुलगा) यांनी दि. 26.08.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 नळदुर्ग: कार क्र. एम.एच. 24 एएफ 0404 च्या अज्ञात चालकाने धनगरवाडी फाटा परिसरातील योगेश भोजनालया समोरील रस्त्यावर दि. 25.08.2020 रोजी 22.00 वा. सु. कार निष्काळजीपणे चालवून रस्ता ओलांडणारे- भिमशा अंबन्ना पालाडी, वय 23 वर्षे, रा. मुडूबीवाडी, ता. बसवकल्याण, जि. बिदर, राज्य- कर्नाटक यांना धडक दिली. यात भिमशा पालाडी हे गंभीर जखमी होउन मयत झाले. अपघातानंतर जखमीस उपचारास न नेता, अपघाताची खबर पोलीसांना न देता संबंधीत कार चालक घटनास्थळावरुन निघुन गेला. अशा मजकुराच्या मल्लया गुरया स्वामी, रा. त्रिपंरात, ता. बसवकल्याण यांनी दि. 26.08.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ), 337, 338 सह मो.वा.का. कलम- 134 (अ)(ब), 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

No comments