Header Ads

उस्मानाबाद जिल्हा : जुगार विरोधी विशेष मोहिमे दरम्यान 13 छापे


उस्मानाबाद -  . पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांच्या आदेशाने दि. 25.08.2020 रोजी राबवलेल्या जुगार विरोधी विशेष मोहिमेदरम्यान जुगार साहित्य व रोख रक्कम असा 15,640 ₹ माल जप्त करण्यात आला. यावरुन 13 व्यक्तींविरुध्द संबंधीत पोलीस ठाण्यात म.जु.का. अंतर्गत 13 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलीस ठाणे, कळंब: विनोद जगताप, रा. कल्पनानगर, कळंब हा होळकर चौकातील पत्रा शेडमध्ये कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्य व रोख रक्कम 1,170/-रु. बाळगला असतांना पो.ठा. कळंब च्या पथकास आढळला.

पोलीस ठाणे, उमरगा: यशवंत गंगणे, रा. जळकोट हा प्रभात हॉटेल मागील गल्लीत कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्य व रोख रक्कम 750/-रु. बाळगला असतांना पो.ठा. उमरगा च्या पथकास आढळला.

पोलीस ठाणे, उस्मानाबाद (श.): शाम पेठे, रा. फकीरानगर, उस्मानाबाद हा बीएसएनएल कार्यालयाजवळील पत्राशेडमध्ये कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्य व रोख रक्कम 1,3500/-रु. बाळगलेला आढळला.

मेहराज शेख, रा. वैराग नाका हा दर्गाह रस्त्यावरील पुलावर कल्याण मटका जुगार साहित्य व रोख रक्कम 1,200/-रु. बाळगलेला असतांना आढळला.

इरफान शेख, रा. ख्वॉजानगर (पु.) हा गल्लीतील एम.के. हॉलजवळ मटका जुगार साहित्य व रोख रक्कम 1,060/-रु. बाळगला असतांना आढळला.

राजेंद्र मगर, रा. पापनाशनगर हा जुनाबस डेपो परिसरात मटका जुगार साहित्य व रोख रक्कम 1,175/-रु. बाळगला असतांना आढळला.

पोलीस ठाणे, तामलवाडी: गोविंद फुटके, रा. तामलवाडी हा तामलवाडी शिवारातील कांच ढाबा येथे कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्य व रोख रक्कम 515/-रु. बाळगला असतांना पो.ठा. तामलवाडी च्या पथकास आढळला.

पोलीस ठाणे, लोहारा: बालाजी देशपांडे, रा. कोंडजीगड हा आपल्या घरा समोर कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्य व रोख रक्कम 1,270/-रु. बाळगला असतांना पो.ठा. लोहारा च्या पथकास आढळला.

पोलीस ठाणे, तुळजापूर: एजाज शेख, रा. नेताजीनगर, तुळजापूर हा मराठा खानावळी समोरील पानटपरीच्या बाजूस कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्य व रोख रक्कम 3,020/-रु. बाळगला असतांना पो.ठा. तुळजापूर च्या पथकास आढळला.

पोलीस ठाणे, आनंदनगर: परमेश्वर बळी, रा. काकानगर, उस्मानाबाद हा गोरोबाकाका नगर परिसरात कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्य व रोख रक्कम 1,710/-रु. बाळगला असतांना पो.ठा. आनंदनगर च्या पथकास आढळला.

पोलीस ठाणे, उस्मानाबाद (ग्रा.): ज्ञानेश्वर वाडवे, रा. येडशी, उस्मानाबाद हा येडशी बस स्थानकाशेजारी मटका जुगार साहित्य व रोख रक्कम 710/-रु. बाळगला असतांना आढळला.

पोलीस ठाणे, बेंबळी: मारुती गवळी, रा. केशेगांव, ता. उस्मानाबाद हा गावातील साई हॉटेलच्या बाजूस मटका जुगार साहित्य व रोख रक्कम 1,230/-रु. बाळगला असतांना आढळला.

पोलीस ठाणे, ढोकी: पिंटु देवकर, रा. तेर हा गावातील बस थांब्या शेजारी मटका जुगार साहित्य व रोख रक्कम 480/-रु. बाळगला असतांना आढळला.

अवैध मद्यविरोधी कारवाया

पोलीस ठाणे, उमरगा: 1)विलास शंकर भांगे 2)शिवराम लिंगाप्पा कवडे, दोघे रा. हिप्परगाराववाडी, ता. उमरगा हे दि. 25.08.2020 रोजी गावातील आपल्या घराजवळ गावठी दारु निर्मीतीचा 900 लि. द्रवपदार्थ व 100 लि. गावठी दारु (साहित्यासह किं.अं. 42,000/-रु.) बाळगले असतांना आढळले. तो द्रवपदार्थ पोलीसांनी जागीच ओतून नष्ट केला.

पोलीस ठाणे, येरमाळा: कुंडलीक शिंदे, रा. बावी, ता. वाशी हा दि. 25.08.2020 रोजी मौजे गोजवाडा रस्त्यावरील बाभळीच्या झाडाखाली 180 मि.ली. देशी दारुच्या 10 बाटल्या (किं.अं. 800/-रु.) विनापरवाना बाळगला असतांना आढळला.

        यावरुन नमूद व्यक्तींविरुध्द म.दा.का. अंतर्गत संबंधीत पो.ठा. येथे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

No comments