Header Ads

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी जेरबंद
स्थानिक गुन्हे शाखा: मौजे बुकनवाडी, ता. उस्मानाबाद येथील सुरेश काळे याचा दि. 19.08.2020 रोजी 13.00 वा. सु. गावातील लोहमार्गा जवळील गायराण शेतात दोरीने गळा आवळुन खुन झाला होता. तसेच त्याच्या आत्महत्येचा बनाव रचण्यासाठी आरोपींनी त्याच्या प्रेतास गळफास लावून लिंबाच्या झाडास लटकवले होते. अटकेच्या भितीने या गुन्ह्यातील आरोपींनी गावातून पलायन केलेले आहे. यापैकी एक आरोपी- अंकुश इंद्रजीत बुकन, रा. बुकनवाडी, ता. उस्मानाबाद यास स्था.गु.शा. च्या सपोफौ- खोत, पोहेकॉ- काझी, पोना- शेळके, पोकॉ- आरसेवाड, सर्जे यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे काल दि. 24.08.2020 रोजी ताब्यात घेउन उर्वरीत तपासकामी पो.ठा. ढोकी यांच्या ताब्यात दिले आहे.

No comments