Header Ads

परंडा : सुनेचा छळ, गुन्हा दाखल परंडा: विद्या शांतीलाल नागरगोजे, रा. तांबेवाडी, ता. भुम या घरबांधनीसाठी माहेरहुन पैसे आनत नसल्याच्या कारणावरुन 1)शांतीलाल शहादेव नागरगोजे (पती) 2) प्रयागबाई नागरगोजे (सासु) 3)बाळकृष्ण नागरगोजे (दिर) तीघे रा. येवलवाडी, ता. पाटोदा या तीघांनी विद्या यांचा सन- 2018 पासुन सासरी- येवलवाडी येथे वेळोवेळी शारिरीक- मानसिक छळ केला. तसेच माहेरी- तांबेवाडी येथे येउन पैसे आनल्याशिवाय नांदवणार नसल्याचे विद्यास धमकावले. अशा मजकुराच्या विद्या यांच्या प्रथम खबरेवरुन नमूद आरोपींविरुध्द भा.दं.वि. कलम- 498 (अ), 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दि. 26.08.2020 रोजी नोंदवला आहे.

अल्पवयीन मुलीचे अपहरण

उस्मानाबाद जिल्हा: एका 14 वर्षीय मुलीस (नाव- गाव गोपनीय) लग्नाचे आमीष दाखवून गावातीलच एका तरुणाने दि. 26.08.2020 रोजी 05.30 वा. तीचे अपहरण केले आहे. अशा मजकुराच्या अपहृत मुलीच्या वडीलाच्या प्रथम खबरेवरुन संबंधीत तरुणाविरुध्द भा.दं.सं. कलम- 363, 366 सह पोक्सो व ॲट्रॉसिटी कायदा अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

No comments