Header Ads

खुनासहित दरोडा, मोका गुन्ह्यातील पाहिजे आरोपी पाठलागानंतर जेरबंदउस्मानाबाद - विलास लक्ष्मण भोसले, रा. सिंदगाव, ता. तुळजापूर यांचा सावत्र आई- जयाबाई, वय 45 रा. जेवळी, ता. लोहारा यांच्याशी कौटुंबीक संघर्ष होता. यातुन त्याने आपली मुले- किरण व अर्जुन यांसह  जावई- विशाल परमेश्वर शिंदे, यांच्या मदतीने दि. 07.03.2020 रोजी 23.00 वा. सु जयाबाई यांना राहत्या घरी लोखंडी सळई, चाकु- भाल्याने वार करुन ठार केले होते. तर आई सोबत असणाऱ्या संतोष पवार यांना गंभीर जखमी केले होते. गुन्ह्यानंतर सर्व आरोपी अटक टाळण्यासाठी बेपत्ता झाले होते. ते गावापासून दुर अंतरावर माळरानावर ते पाल टाकून राहत असत. त्यांचा ठावठीकाणा पोलीसांना वेळोवेळी मिळुन येत होता. परंतु पथक पोहचण्यापुर्वीच ते आपले ठिकाण बदलत असत.

चौघा आरोपींपैकी विलास भोसले व विशाल शिंदे हे दोघे तुळजापूर तालुक्यातील मौजे कुनसावळे शिवारात पाल टाकून राहत असल्याची गोपनीय खबर स्था.गु.शा. च्या पोउपनि- श्री. पांडुरंग माने यांच्या पथकास मिळाली. यावर स्था.गु.शा. चे पोनि- श्री. दगुभाई शेख, सपोनि- श्री. आशिष खांडेकर, पोउपनि- श्री. पांडुरंग माने यांसह 12 पोलीस कर्मचारी व लोहारा पो.ठा. चे सपोनि- श्री. चौरे व 8 पोलीस कर्मचारी अशा 24 सदस्यांच्या पथकाने कुनसावळे शिवारातील पालावर दि. 30.08.2020 रोजी मध्यरात्री 02.00 छापा टाकला. पोलीसांची चाहुल लागताच आरोपी- विलास व विशाल हे दोघे तेथून पळून जाउ लागले. यावर पथकाने त्यांचा पाठलाग करुन आवश्यक बळाचा वापर करुन त्यांना जेरबंद केले.

यातील विलास भोसले हा वरील गुन्ह्यासोबतच तामलवाडी पो.ठा. गु.र.क्र. 83 / 2014 या खुनासहीत दरोड्याच्या, मोका कायद्यांतर्गत गुन्ह्यातील पाहिजे आरोपी असुन गेली 6 वर्षे तो लपुन-छपून राहत होता. तर याच गुन्ह्यातील त्याच्या 3 साथीदारांना मा. न्यायालयाने यापुर्वीच जन्मठेप सुनावली आहे.

पोलीस पथकाने केलेल्या या कारवाईबद्दल मा. पोलीस अधीक्षक श्री. राज तिलक रौशन व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. संदीप पालवे यांनी अभिनंदन केले आहे.

No comments