Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे दोन गुन्हे
पोलीस ठाणे, उस्मानाबाद (ग्रा.): कैलास दत्तात्रय घोडके, रा. नेहरु चौक, उस्मानाबाद यांच्या मौजे सोनेगांव, ता. उस्मानाबाद येथील शेत गट क्र. 136 मध्ये असलेल्या हॉट मिक्सर डांबर प्लँट मधील हॉवेल कंपनीचे विद्युत पंप 25 अश्वशक्तीचे- 2, 5 अश्वशक्तीचे- 2, 7.5 अश्वशक्तीचा- 1, 2 अश्वशक्तीचे- 4 असे एकुण 9 विद्युत पंप व 800 फुट केबल असा एकुण 1,99,600/-रु. चा माल दि. 01.08.2020 रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्याने चोरुन नेला आहे. अशा मजकुराच्या कैलास घोडके यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 02.08.2020 रोजी नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, बेंबळी: रहीम शेख रहीम मुस्ताफा, रा. बेंबळी, ता. उस्मानाबाद यांनी त्यांची हिरो स्प्लेंडर मो.सा. क्र. एम.एच. 25 झेड 6696 ही दि. 30.07.2020 रोजी मध्यरात्री आपल्या राहत्या घरा समोर लावली होती. दुसऱ्या दिवशी ती त्यांना लावल्या जागी आढळुन आली नाही. यावरुन अज्ञात चोरट्याने ती चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या रहीम शेख यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 02.08.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments