Header Ads

नळदुर्ग : अपघातात तरुण मयत
पोलीस ठाणे, नळदुर्ग: सुरेश राजु चव्हाण, वय 30 वर्षे, रा. अचलेर, ता. लोहारा हे दि. 02.08.2020 रोजी 01.30 वा. सु. राष्ट्रीय महामार्ग क्र.- 65 वर गोलाई चौक, नळदुर्ग येथील रस्त्याने मो.सा. क्र. एम.एच. 25 एक्यु 0561 चालवत जात होते. दरम्यान सोलापूर कडून येणारा ट्रक क्र. के.ए. 56- 1634 च्या चालकाने सुरेश चव्हाण यांना जोराची धडक दिल्याने ते गंभीर जखमी होउन मयत झाले. अपघातानंतर जखमीस उपचारास न नेता, अपधाताची खबर पोलीसांना न देता ट्रक चालक घटनास्थळावरुन निघुन गेला. अशा मजकुराच्या बाबु राजु चव्हाण (मयताचा भाऊ) यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद ट्रकच्या अज्ञात चालकाविरुध्द भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 134 (अ)(ब), 184 अन्वये गुन्हा दि. 03.08.2020 रोजी नोंदवला आहे.

मारहाण

पोलीस ठाणे, ढोकी: नंदकुमार भगवान काटे, रा. तडवळे (क.), ता. उस्मानाबाद हे दि. 02.08.2020 रोजी 13.00 वा. सु. गावच्या शेत शिवारातील रस्त्याने मोटारसायकल चालवत जात होते. दरम्यान भाऊबंद- अशोक दिलीप काटे, किशोर काटे, बाबु काटे अशा तीघांनी नंदकुमार काटे यांना अडवून पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन नंदकुमार यांना पाईप, लाकडी दांड्याने मारहाण करुन जखमी केले. नंदकुमार यांना वाचवण्यास आलेल्या त्यांच्या पत्नी- वंदना काटे यांनाही शिवीगाळ करुन ढकलून दिले व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या नंदकुमार काटे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद तीघांविरुध्द गुन्हा   दि. 03.08.2020 रोजी नोंदवला आहे.
आर्थिक नुकसान
पोलीस ठाणे, तुळजापूर: महाविर दिलीप जाधव, रा. देवसिंगा (तुळ), ता. तुळजापूर यांच्या मौजे देवसिंगा (तुळ) शेत गट क्र. 185 मधील बांधकाम भाऊबंद- रत्नदीप भाउसाहेब जाधव, भाउसाहेब जाधव, उर्मिला जाधव अशा तीघांनी दि. 25.07.2020 रोजी 10.30 वा. सु. एक्सकॅव्हेटर यंत्राच्या सहायाने पाडुन अंदाजे 5,00,000/-रु. चे नुकसान केले. त्यावेळी महाविर जाधव यांनी त्यांना जाब विचारला असता नमूद तीघांनी महाविर जाधव यांना शिवीगाळ करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या महाविर जाधव यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद तीघांविरुध्द भा.दं.सं. कलम- 447, 427, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दि. 02.08.2020 रोजी नोंदवला आहे.

1 comment

AMBADAS V GORE said...

एवढी मोठी महामारी कोसळली आहे तरीही हे जमीन वाद का वाढतात हेच समजत नाही.