Header Ads

कोरोना टाळण्यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांचा अनोखा उपक्रमउस्मानाबाद  - कोविड- 19 साथीमुळे गर्दीचे कार्यक्रम- उत्सव, यात्रा यावर मर्यादा आल्या असुन अनेक गावच्या यात्रा- उत्सव जनतेने स्वयंस्फुर्तीने रद्द केल्या आहेत. आगामी गणेशोत्सव साजरा करण्यासंदर्भात मार्गदर्शक तत्वे महाराष्ट्र शासनाने जाहीर केली आहेत. त्या अनुशंगाने पोलीस प्रशासनाकडून पोलीस ठाणे स्तरावर तसेच ग्रामीण पातळीवरील सार्वजनिक गणेश मंडळे, शांतता समिती, ग्रामसुरक्षा दल, कोरोना वॉरियर्स व स्थानिक प्रशासन यांच्याशी संपर्क साधुन मॅराथॉन बैठकांचे आयोजन केले जात आहे. कोरोनामुक्त समाजासाठी जनसहभाग आवश्यक असुन गर्दी टाळने गरजेचे असल्याचे पोलीस प्रशासन जनतेचे प्रबोधन करुन त्यांना पटवून देत आहे.


 या जनसहभागातूनच उस्मानाबाद जिल्ह्यातील 17 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करता सामाजिक उपक्रम राबवनार असल्याची माहिती काल दि. 15.08.2020 रोजी पर्यंत पोलीस प्रशासनास दिली आहे. तर खेडे गावांत ‘एक गाव- एक गणपती’ तर शहरात ‘एक वॉर्ड- एक गणपती’ ही संकल्पना राबवण्याचा निर्णय 120 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी घेतला आहे. उस्मानाबाद शहरातील ‘क्लीन समता- ग्रीन समता परिवार’ या मंडळाने प्रतीवर्षी साजरा केला जाणारा सार्वजनिक गणेशोत्सव सोहळा रद्द केल्याचे जाहिर केले आहे. मंडळांनी घेतलेल्या या लोकाभिमुख निर्णयाबद्दल  पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांनी त्या मंडळ सदस्यांचे अभिनंदन केले असुन उर्वरीत मंडळांनीही त्यांचा आदर्श घ्यावा असे आवाहन केले आहे.

No comments