Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखलउस्मानाबाद -  जगदीश मनोहर शिंदे, रा. शिंगोली, ता. उस्मानाबाद यांच्या शिंगोली शेत गट क्र. 45 मध्ये असलेल्या शेळीपालन शेड मधून अज्ञात चोरट्याने काळ्या रंगाच्या पाठशिंगे असलेल्या 11 शेळ्या व 3 बोकड (किं.अं. 70,000 ₹) दि. 13.08.2020 रोजी मध्यरात्री चोरुन नेल्या. यावरुन त्यांच्या फिर्यादीवरुन दि. 14.08.2020 रोजी भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद -  मौजे येडशी, ता. उस्मानाबाद येथे असलेल्या खडी क्रेशर केंद्रावर उभे असलेल्या टिप्पर क्र. एम.एच. 04 बीजी 6869 चे चार चाके व एक्सकॅव्हेटर यंत्र क्र. एम.एच. 16 एफ 6345 च्या इंधन टाकीतील 115 ‍लि. डिझेल (एकत्रीत किं.अं. 49,000 ₹)दि. 13.08.2020 रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्याने चोरुन नेले आहे. अशा मजकुराच्या खडी केंद्राचे मालक- गजानन नलावडे, रा. येडशी यांनी दि. 14.08.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 बेंबळी: पोपट शंकर जमदाडे, रा. रुईभर, ता. उस्मानाबाद यांनी त्यांची मो.सा. क्र. एम.एच. 25 एजी 6215 ही दि. 13.08.2020 रोजी रात्री घरा समोर लावली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी ती त्यांना लावल्या जागी आढळुन आली नाही. यावरुन ती अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या पोपट जमदाडे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन गुन्हा दि. 15.08.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments