Header Ads

उस्मानाबाद जिल्हा : जुगार विरोधी विशेष मोहिमे दरम्यान 30 छापेउस्मानाबाद जिल्हा:  पोलीस अधीक्षक  राज तिलक रौशन यांच्या आदेशाने दि. 12.08.2020 रोजी जुगार विरोधी विशेष मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान मोहिमे दरम्यान आढळलेले जुगार साहित्य व रोख रक्कम यांची एकत्रीत किंमत 35,025 ₹ आहे. यावरुन संबंधीत पोलीस ठाण्यात म.जु.का. अंतर्गत 30 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलीस ठाणे, कळंब: 1)आकाश शामराव राउत 2)गोरखनाथ भिमराव थोरात, दोघे रा. कळंब हे दि. 12.08.2020 रोजी जुनी दुध डेअरी, कळंब येथे चक्री जुगार चालवण्याच्या साहित्यासह रोख रक्कम 2,680/-रु. बाळगले असतांना पो.ठा. कळंब च्या पथकास आढळले.

पोलीस ठाणे, आनंदनगर: राजेश भिमा कांबळे, रा. उस्मानाबाद हा दि. 12.08.2020 रोजी तेरणा चौक, उस्मानाबाद येथे कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व रोख रक्कम 525/-रु. बाळगलेला तर त्याच दिवशी ऋषीकेश रविंद्र रणशृंगारे, रा. शिंगोली, ता. उस्मानाबाद हा शिंगोली बस स्थानक येथे कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व रोख रक्कम 745/-रु. बाळगला असतांना पो.ठा. आनंदनगर च्या पथकास आढळला.

पोलीस ठाणे, वाशी: रमेश लिंबराज मोळवणे, रा. वाशी हा दि. 12.08.2020 रोजी पारा येथील चौकात कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह रोख रक्कम 510/-रु. बाळगला असतांना पो.ठा. वाशी च्या पथकास आढळला.

पोलीस ठाणे, नळदुर्ग: नेताजी गंगणे, रा. जळकोट हा दि. 12.08.2020 रोजी जळकोट येथील एका हॉटेल जवळ कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व रोख रक्कम 830/-रु. बाळगलेला तर त्याच दिवशी मल्लिकार्जुन नामणे, रा. वत्सलानगर, अणदुर हा स्वत:च्या घराजवळ कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व रोख रक्कम 870/-रु. बाळगला असतांना पो.ठा. नळदुर्ग च्या पथकास आढळला.

पोलीस ठाणे, उस्मानाबाद (श.): बबन तट व प्रमोद शेरकर, दोघे रा. उस्मानाबाद हे दोघे दि. 12.08.2020 रोजी उस्मानाबाद येथील अंबिका पानस्टॉल समोर कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व रोख रक्कम 1,090/-रु. बाळगलेले तर त्याच दिवशी मकबुल टकारी व मुक्तार शेख, दोघे रा. खिरणीमळा, उस्मानाबाद हे दोघे मकबुल टकारी याच्या शेड समोर कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व रोख रक्कम 630/-रु. बाळगले असतांना पो.ठा. उस्मानाबाद (श.) च्या पथकास आढळले.

पोलीस ठाणे, ढोकी: सोमनाथ उत्तरेश्वर पवार, रा. तडवळा, ता. उस्मानाबाद हा दि. 12.08.2020 रोजी तडवळा बस स्थानकाच्या बाजूस कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व रोख रक्कम 480/-रु. बाळगलेला तर त्याच दिवशी प्रशांत चंद्रकांत देशपांडे, रा. ढोकी हा हनुमान चौक, ढोकी येथे कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व रोख रक्कम 450/-रु. बाळगला असतांना तसेच मजीद रशीद शेख, रा. ढोकी, ता. उस्मानाबाद हा ढोकी बस स्थानक परिसरातील पेट्रोलीयम विक्री केंद्राजवळ कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह रोख रक्कम 500/-रु. बाळगले असतांना पो.ठा. ढोकी च्या पथकास आढळले.

पोलीस ठाणे, उस्मानाबाद (ग्रा.): मोतीराम पवार, रा. वरुडा, ता. उस्मानाबाद हा वरुडा येथे कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व रोख रक्कम 520/-रु. बाळगला तर त्याच दिवशी सुदर्शन जगताप, रा. येडशी हा येडशी बस स्थानकाजवळ कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व रोख रक्कम 1,120/-रु. बाळगला असतांना पो.ठा. उस्मानाबाद (ग्रा.) च्या पथकास आढळला.

पोलीस ठाणे, उमरगा: सचिन सुर्यवंशी, रा. औटी गल्ली, गुंजोटी हा गुंजोटी येथे तर त्याच दिवशी ज्ञानोबा चिकुंद्रे, रा. नारंगवाडी हा नारंगवाडी येथे व सतिश बिराजदार, रा. उमरगा हा पतंगे रोड, उमरगा येथे कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह व एकत्रीत रोख रक्कम 3,175/-रु. बाळगलेले तसेच राम माधव हराळे, रा. जकेकुर, ता. उमरगा हा मौजे जकेकुर चौरस्ता येथील आपल्या पानटपरीवर कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह रोख रक्कम 1,230/-रु. बाळगले असतांना पो.ठा. उमरगा च्या पथकास आढळले.

पोलीस ठाणे, परंडा: सादीक सय्यद, रा. शेकापूर, ता. भुम हा दि. 12.08.2020 रोजी शेकापूर येथे कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह रोख रक्कम 460/-रु. बाळगला असतांना पो.ठा. परंडा च्या पथकास आढळला.

पोलीस ठाणे, बेंबळी: तात्या वसंत घुले, रा. समुद्रवाणी, ता. उस्मानाबाद हा दि. 12.08.2020 रोजी समुद्रवाणी येथे कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह रोख रक्कम 1,520/-रु. बाळगला असतांना पो.ठा. बेंबळी च्या पथकास आढळला.

पोलीस ठाणे, भुम:  जुगार चालू असल्याच्या गोपनीय खबरेवरुन तुळजापूर पोलीसांनी दि. 12.08.2020 रोजी मौजे उळुप येथे छापा मारला. यात उळुप येथील वेशीजवळ 1)माणिक भंडारे 2)काणिफनाथ वरळे 3)नवनाथ जाधव 4)बाळु मोरे 5)दत्ता जाधव 6)विठ्ठल सानप 7)संभाजी वराळे, सर्व रा. उळुप, ता. भुम हे तिरट जुगार खेळत असतांना जुगाराच्या साहित्यासह रोख रक्कम 2,620/-रु. बाळगले असतांना तर निलेश शेळके, गणेश मुसळे, दोघे रा. भुम हे भुम बस स्थानका मागील ओट्यावर कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह रोख रक्कम 1,500/-रु. बाळगले असतांना पो.ठा. भुम च्या पथकास आढळले.

पोलीस ठाणे, मुरुम: प्रमोद सोलापूरे, रा. आष्टाकासार, ता. लोहारा हा दि. 12.08.2020 रोजी आष्टाकासार बस स्थानक येथे तर त्याच दिवशी सचिन गुंजोटे, रा. येणेगूर, ता. उमरगा हा येणेगूर शिवारात अनुक्रमे मिलन नाईट व एम आर मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह एकत्रीत रोख रक्कम 860/-रु. बाळगले असतांना पो.ठा. मुरुम च्या पथकास आढळले.

पोलीस ठाणे, तुळजापूर: जुगार चालू असल्याच्या गोपनीय खबरेवरुन तुळजापूर पोलीसांनी दि. 12.08.2020 रोजी तीन ठिकाणी छापे मारले. यात मंगरुळ येथे फरिद शेख यांच्या शेड जवळ 1)आरिफ शेख 2)शंकर पवार 3)बाबा शेख 4)जितेंद्र सरडे 5)युन्नुस शेख 6)फरिद शेख, सर्व रा. मंगरुळ, ता. तुळजापूर हे तिरट जुगार खेळत असतांना जुगाराचे साहित्य व रोख 2,620/-रु. च्या मालासह तर दुसऱ्या घटनेत बोंबल्या चौक, तुळजापूर येथील बालाजी जाधव यांच्या पत्रा शेडमध्ये 1)बालाजी जाधव 2)जगदीश साळुंके 3)संतोष इंगळे 4)राजेंद्र गाटे 5)किशोर जमदाडे 6)श्रीकांत कवडे 7)संजय घुले 8)शकील शेख, सर्व रा. तुळजापूर हे तिरट जुगार खेळत असतांना जुगाराचे साहित्य व रोख 5,200/-रु. बाळगले असतांना तीसऱ्या घटनेत धर्मा राम जाधव रा. वेताळ गल्ली, तुळजापूर हा औदुंबर भक्त निवास समोरील पानटपरी जवळ कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह रोख रक्कम 1,710/-रु. बाळगले असतांना पो.ठा. तुळजापूर च्या पथकास आढळले.

पोलीस ठाणे, नळदुर्ग: काशीम नदाफ, रा. केशेगाव, ता. तुळजापूर हा दि. 12.08.2020 रोजी स्वत:च्या घरा समोर मल्याण मटका जगार चालवण्याच्या साहित्यासह रोख रक्कम 670/-रु. बाळगलेला तर त्याच दिवशी बबलू शेख, सादिक शेख, अजमल शेख, तीघे रा. नळदुर्ग हे लाकुड वखार, नळदुर्ग येथे तिरट जुगार खेळत असतांना जुगाराच्या साहित्यासह रोख रक्कम 930/-रु. बाळगले असतांना पो.ठा. नळदुर्ग च्या पथकास आढळले.

पोलीस ठाणे, शिराढोण: जुगार चालू असल्याच्या गोपनीय खबरेवरुन शिराढोण पोलीसांनी दि. 12.08.2020 रोजी दोन ठिकाणी छापे मारले. यात शिराढोण बस स्थानकाजवळील चहा हॉटेल मध्ये विनायक चंदन हा कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व रोख 540/-रु. च्या मालासह तर दुसऱ्या घटनेत शासकीय आरोग्य केंद्रा बाहेरील चहा हॉटेल मध्ये पाशा गुलाम बेग हा कल्याण मटका जुगार साहित्य व रोख 510/-रु. च्या मालासह पो.ठा. शिराढोण च्या पथकास आढळला.

       यावरुन वर नमूद 54 व्यक्तींविरुध्द म.जु.का. अंतर्गत संबंधीत पो.ठा. येथे 30 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

No comments