Header Ads

बेवारस आढळलेले ते तेलगु भाषीक बहिण- भाऊ बालगृहातून पुन्हा बेपत्ता
नळदुर्ग: उमरगा चौरस्ता येथे दि. 15.08.2020 रोजी 4 बालके उमरगा पोलीसांना आढळली होती. न्यायालयाच्या आदेशाने त्यांना नळदुर्ग, ता. तुळजापूर येथील ‘अपना घर’ या बालगृहात ठेवले होते. यातील कावेरी पेदापल्लीगेनू, वय 12 वर्षे, व तीचा भाऊ- नानीसेनू पेदापल्लीगेनू, वय 8 वर्षे हे दोघे बहिण- भाऊ दि. 18.08.2020 रोजी बालगृहातून परस्पर निघुन गेले होते. अक्कलकोटचया दिशेने पायी जाणाऱ्या या दोघा बहिण- भावास पोलीसांनी त्याच दिवशी अवघ्या 8 तासांत शोधुन पुन्हा अपना घर येथे दाखल केले होते.

            हे दोघे बहिण- भाऊ दि. 23.08.2020 रोजी 15.30 वा. सु. ‘अपना घर’ मधून पुन्हा बेपत्ता झाले आहेत. हि बालके आढळल्यास नजीकचे पोलीस ठाणे किंवा अपना घर, नळदुर्ग येथे कळवावे. असे आवाहन उस्मानाबाद पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे. 

No comments