Header Ads

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगीक अत्याचार
उस्मानाबाद - जिल्ह्यातील एका खेडेगावातील 22 वर्षीय तरुणीस (नाव- गाव गोपनीय) एका तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून दि. 13.08.2020 रोजी तीच्यावर लैंगीक अत्याचार केला. तसेच त्या तरुणीने अन्य व्यक्ती सोबत लग्न केल्यास तीला व तीच्या कुटूंबीयांस जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या संबंधीत तरुणीने दि. 22.08.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 376 (2)(एन), 341, 504, 506 सह ॲट्रॉसिटी कायदा अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मारहाण
 तामलवाडी: मौजे नांदुरी, ता. तुळजापूर येथील गणेश सुरवसे व खंडु मुळेकर या दोन्ही कुटूंबीयांत दि. 22.08.2020 रोजी 19.00 वा. सु. किरकोळ कारणावरुन भांडणे झाली. यात परस्परविरोधी कुटूंबीयांस लाथाबुक्यांनी, दगड, विटांनी मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या दोन्ही कुटूंब सदस्यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन 2 स्वतंत्र गुन्हे भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अन्वये नोंदवण्यात आले आहेत.


सुनेचा छळ, गुन्हा दाखल


 परंडा: अंजली गणेश पाटुळे, रा. आष्टावाडी, ता. भुम या माहेरहुन पैसे आनत नसल्याच्या कारणावरुन 1)गणेश आप्पासाहेब पाटुळे (पती) 2) राजामाती पाटुळे (सासु) 3)आप्पासाहेब पाटुळे (सासरा) 4)अविनाश पाटुळे (दिर) 5)उमेश पाटुळे (दिर) सर्व रा. आरसोली, ता. भुम या सर्वांनी अंजली यांचा सन- 2019 पासुन वेळोवेळी शारिरीक- मानसिक छळ केला. तसेच माहेरहुन पैसे आनल्याशिवाय नांदवणार नसल्याचे धमकावले. अशा मजकुराच्या अंजली पाटुळे यांच्या प्रथम खबरेवरुन नमूद आरोपींविरुध्द भा.दं.वि. कलम- 498 (अ), 323, 504, 34 अन्वये गुन्हा दि. 22.08.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments