Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात तीन अपघातात दोन मयत
नळदुर्ग: खंडु मल्हारी क्षिरसागर, रा. टेलरनगर, ता. तुळजापूर यांनी दि. 17.08.2020 रोजी 19.00 वा. सु. टेलरनगर शिवारातील रस्त्यावर मो.सा. क्र. एम.एच. 13 डीके 3670 ही निष्काळजीपणे चालवून पायी चालनाऱ्या गावातील- दिलीप केदारी पवार, वय 49 वर्षे यांना समोरुन धडक दिली. या अपघातात दिलीप पवार हे गंभीर जखमी होउन मयत झाले. अशा मजकुराच्या आकाश दिलीप पवार (मयताचा मुलगा) यांनी दि. 21.08.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


 तुळजापूर: भिमाशंकर शिवहार व्होर्टे, वय 50 वर्षेख्, रा. बारुळ, ता. तुळजापूर हे दि. 20.08.2020 रोजी 14.00 वा. सु. मौजे वडगांव (लाख) येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. 361 वरुन मो.सा. क्र. एम.एच. 25 झेड 7292 ही चालवत जात होते. यावेळी वाहन क्र. एम.एच. 24 वाय 9288 ने भिमाशंकर व्होर्टे यांच्या मो.सा. ला धडक दिल्याने ते गंभीर जखमी होउन मयत झाले. अपघातानंतर जखमीस वैद्यकीय उपचारास न नेता, पोलीसांना खबर न देता संबंधीत वाहन चालक घटनास्थळावरुन निघुन गेला. अशा मजकुराच्या काशीनाथ विश्वनाथ जगताप, रा. वडगांव (लाख) यांनी दि. 21.08.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 134 (अ)(ब) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


उस्मानाबाद - ट्रक क्र. आर.जे. 14 जीएच 8086 हा उस्मानाबाद- बीड असा राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 ने दि. 22.08.2020 रोजी रात्री 240 वा. जात होता. दरम्यान महामार्गावरील उपळा फाटा येथील उड्डान पुलाच्या चढावर महिंद्रा माराझो कार क्र. एम.एच. 25 एएल 3600 ने ट्रकला पाठीमागून धडक दिली. यात कारमधील अज्ञात व्यक्ती जखमी होउन कार व ट्रकचे आर्थिक नुकसान झाले. अशा मजकुराच्या ट्रक चालक- शौकीन शोराब, रा. हरयाणा राज्य यांच्या प्रथम खबरेवरुन महिंद्रा माराझो कारच्या अज्ञात चालकाविरुध्द भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 427 सह मो.वा.का. कलम- 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

No comments