Header Ads

ढोकी : चोरी करणाऱ्यास पहारेकऱ्यांनी पकडले


 

 

पोलीस ठाणे, ढोकी: सुनिल जनार्धन लंगडे, रा. ढोकी, ता. उस्मानाबाद हे दि. 05.08.2020 रोजी तेरणा साखर कारखाना, ढोकी येथे पहारेकरी म्हणुन कर्तव्यावर होते. पहाटे 04.00 वा. सु. कारखान्याच्या गव्हानीकडे संशयास्पद हालचाली जाणवल्याने सुनील लंगडे सहकाऱ्यासह तेथे गेले. यावेळी विलास ईश्वर काळे व सुभाष श्रीरंग चव्हाण, दोघे रा. ढोकी पारधी पिढी हे उसाच्या बैलगाडीचे टायर डिक्स चोरुन नेण्यासाठी खोलत असलेले आढळले. दरम्यान पहारेकऱ्यांस पाहुन सुभाष चव्हाण याने पलायन केले तर विलास काळे हा पहारेकऱ्यांच्या हाती लागल्याने त्यांनी त्यास पोलीसांच्या ताब्यात दिले आहे. अशा मजकुराच्या सुनिल लंगडे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद दोघांविरुध्द भा.दं.सं. कलम- 379, 511, 34 अन्वये गुन्हा दि. 05.08.2020 रोजी नोंदवला आहे.

 

चोरी

पोलीस ठाणे, उमरगा: रोहित राजेंद्र पतंगे, रा. बालाजी नगर, उमरगा यांच्या उमरगा शहरातील मनिषा बारच्या पाठीमागील दरवाजाचे कुलूप अज्ञात चोरट्याने दि. 02.08.2020 ते 04.08.2020 कालावधीत तोडून आतमधील विदेशी दारुचे 52 खोकी एकुण 3,79,680/-रु. किंमतीचा माल चोरुन नेला आहे. अशा मजकुराच्या रोहित पतंगे यांच्या‍ प्रथम खबरेवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द भा.दं.सं. कलम- 454, 457, 380 अन्वये गुन्हा दि. 05.08.2020 रोजी नोंदवला आहे.

 

अपघात

पोलीस ठाणे, येरमाळा: माणिक विश्वनाथ जगताप, वय 58 वर्षे, रा. रत्नापुर, ता. कळंब हे दि. 05.08.2020 रोजी 05.30 वा. सु. राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 वर मौजे रत्नापुर फाटा येथे पायी चालत जात होते. दरम्यान वाहन क्र. एम.एच. 12 एलडी 3208 या वाहनाने माणिक जगताप यांना धडक दिल्याने ते गंभीर जखमी होउन मयत झाले. अपघातानंतर जखमीस वैद्यकीय उपचाराची तजबीज न करता, अपघाताची खबर पोलीसांना न देता वाहन चालक घटनास्थळावरुन निघून गेला. अशा मजकुराच्या नवनाथ माणिक जगताप (मयताचा मुलगा) यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद वाहनाच्या अज्ञात चालकाविरुध्द भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ), 338 सह मो.वा.का. कलम- 184, 134 (अ)(ब) अन्वये गुन्हा दि. 05.08.2020 रोजी नोंदवला आहे.No comments