Header Ads

नळदुर्ग : परस्पर निघून गेलेली 2 बालके पोलीसांच्या प्रयत्नांनी बालगृहात परतनळदुर्ग: उमरगा चौरस्ता येथे दि. 15.08.2020 रोजी 4 बालके उमरगा पोलीसांना आढळली होती. न्यायालयाच्या आदेशाने त्यांना नळदुर्ग, ता. तुळजापूर येथील ‘अपना घर’ या बालगृहात ठेवण्यात आले होते. यातील कावेरी पेदापल्लीगेनू, वय 12 वर्षे, व तीचा भाऊ- नानीसेनू पेदापल्लीगेनू, वय  8 वर्षे असे दोघे काल दि. 18.08.2020 रोजी 14.30 वा. सु. बालगृहातून परस्पर निघुन गेले.

ही हकीकत अपना घरचे अधीक्षक-  गोरक्ष जाधव यांनी नळदुर्ग पोलीस ठाण्यास कळवली. त्यावर नळदुर्ग पो.ठा. चे सपोनि- जगदीश राऊत यांनी पोलीसांची तीन पथके तयार करुन त्यांचा शोध सुरु केला. त्यांची छायाचित्रे पोलीस, ग्रामसुरक्षा दल यांच्या व्हाट्सअप गटांत प्रसारीत करण्यात येउन जनतेस आवाहन करण्यात आले. त्या दोघा बहीन- भावास तेलुगू व्यतीरीक्त अन्य भाषा येत नसल्याने त्यांचा शोध घेने अवघड बनले होते. दरम्यान रात्री 22.30 वा. सु. ते दोघे बहीन- भाऊ नळदुर्ग बस स्थानकाजवळून अक्कलकोटच्या दिशेने पायी चालत जात असलेले पोहेकॉ- संतीश घंटे, पोना- मोबिन शेख, विजय सुंटनुरे यांच्या पथकास आढळले. पथकाने त्यांना ताब्यात घेउन पुन्हा अपना घर येथे दाखल केले आहे. 

No comments