Header Ads

शिराढोण : अवैध मांस वाहतुक, गुन्हा दाखल शिराढोण: अवैध मांस वाहतुक होणार असल्याची खबऱ्या मार्फत मिळालेल्या माहितीवरुन शिराढोण पो.ठा. च्या पथकाने काल दि. 16.08.2020 रोजी 20.00 वा. सु. मौजे नायगांव चेकपोस्ट परिसरात सापळा लावला. यावेळी 1) सागर पांचाळ 2) मुस्ताक कुरेशी 3) मुजीब कुरेशी 4) आयुब कुरेशी, चौघे रा. शिराढोण हे टाटा एस वाहन क्र. एम.एच. 04 एफडी 9156 मधून 50 किं.ग्रॅ. प्राणीजन्य मांसाची अवैध वाहतुक करत असतांना आढळले.

यावरुन पो.ठा. शिराढोण चे पोना- अभय माने यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद दोघांविरुध्द पा्रणी संरक्षण अधिनियम कलम- 5 (अ),9 (अ) अन्वये गुन्हा दि. 17.08.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

No comments