Header Ads

उस्मानाबाद : गोवंश कत्तलखान्यावर छापा, गुन्हा दाखल
 उस्मानाबाद  -  गोवंशीय कत्तलीस बंदी असतांनाही उस्मानाबाद शहरातील खिरणीमळा येथे अवैध कत्तलखाना चालू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने उस्मानाबाद (श.) पो.ठा. च्या पथकाने दि. 14.08.2020 रोजी 21.45 वा. सु. सदर कत्तलखान्यावर छापा टाकला. घटनास्थळी 1) अफजल बशीर कुरेशी 2) फैसल कौसर पठाण, दोघे रा. उस्मानाबाद यांच्या ताब्यात सुमारे 1600 कि.ग्रॅ. गोवंशीय मांस, कत्तलीचे साहित्य व गोवंशीय मांसाच्या वाहतुकीसाठी असलेला पिकअप क्र. एम.एच. 25 एटी 0783 हा आढळला. त्यांना ताब्यात घेउन त्यांच्याविरुध्द पा्रणी संरक्षण अधिनियम कलम- 5 (अ),9 (अ) अन्वये गुन्हा दि. 15.08.2020 रोजी नोंदवण्यात आला.


गोवंशीय मांस वाहतुक करणाऱ्यावर, गुन्हा दाखल

पोलीस ठाणे, आनंदनगर: गोवंशीय मांस ची अवैध वाहतुक होणार असल्याची खबऱ्या मार्फत मिळालेल्या माहितीवरुन आनंदनगर पो.ठा. च्या पथकाने काल दि. 15.08.2020 रोजी 16.30 वा. सु. उस्मानाबाद शहरात सापळा लावला. यावेळी शहरातील साईकमल हॉटेलसमोरील रस्त्याने 1) रियाज उस्मान कुरेशी, रा. कुरेशी गल्ली, भुम 2) अमजद नजीर शेख, रा. भोनगीरी, ता. भुम हे दोघे मिनी ट्रक क्र. एम.एच. 12 एलटी 9857 मध्ये गोवंशीय मांस 6000 किं.ग्रॅ. भुम- हैद्राबाद अशी अवैध वाहतुक करत असतांना पथकास आढळले.

यावरुन पो.ठा. आनंदनगर चे सपोनि- मनोज निलंगेकर यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद दोघांविरुध्द पा्रणी संरक्षण अधिनियम कलम- 5 (अ),9 (अ) अन्वये गुन्हा दि. 15.08.2020 रोजी नोंदवण्यात आला.

1 comment

AMBADAS V GORE said...

तेथील गोवंश कत्तल खाना कायमस्वरूपी बंद करण्याची कारवाई केली पाहिजे... उस्मानाबाद पोलिस.