Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे चार गुन्हे दाखल उस्मानाबाद -  डॉ.रविंद्र भगवानराव पापडे, रा. सांजा रोड, उस्मानाबाद यांनी ॲक्टीव्हा स्कुटर क्र. एम.एच. 25 एजी 6087 ही दि. 10.08.2020 रोजी 08.00 ते 14.00 वा. चे दरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालया समोर लावलेली अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या डॉ. रविंद्र पापडे यांनी दि. 12.08.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 बेंबळी: विठ्ठल नामदेव ढेपे, रा. ताकवीकी, ता. उस्मानाबाद हे कुटूंबीयांसह दि. 02.08.2020 रोजी रात्री घरी झोपलेले होते. चोरट्यांनी शेजारच्या खोलीचे कुलूप तोडून घरातील संसारीक साहित्य, ज्वारीच्या 2 पोती व घरा समोर उभा असलेल्या ट्रॅक्टरमधील टेपरेकॉर्डर, साउंड, टुलबॉक्स इत्यादी साहित्य अज्ञात चोरट्याने चोरुन नेले आहे. अशा मजकुराच्या विठ्ठल ढेपे यांनी दि. 12.08.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 बेंबळी: बालाजी व्यंकप्पा जाधव, रा. नांदुर्गा, ता. उस्मानाबाद यांच्या घरा समोरील शेड मधील 3 बोकड व 3 शेळ्या अज्ञात चोरट्याने दि. 13.08.2020 रोजी 02.00 ते 04.30 वा. सु. चोरुन नेले आहेत. अशा मजकुराच्या बालाजी जाधव यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 शिराढोण: मौजे दाभा येथील धनेगाव बंधाऱ्याच्या दक्षीण बाजूस असलेल्या रोहित्रामधील तांबे धातूच्या 400 कि.ग्रॅ. तारा व  700 लि. तेल असा एकुण 3,50,000/-रु. माल अज्ञात चोरट्याने दि. 08.08.2020 रोजी मध्यरात्री चोरुन नेला आहे. अशा मजकुराच्या कनिष्ठ विद्युत अभियंता- अशोक सोपानराव पिसाळ यांनी दि. 13.08.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

No comments