Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे चार गुन्हे दाखलयेरमाळा: धनंजय पांडुरंग घोळवे, रा. तेरखेडा, ता. वाशी यांच्या मौजे रत्नापूर फाटा जवळील ‘पांडुरंग हॉटेल’ च्या खिडकीचा काच अज्ञात चोरट्याने दि. 07.08.2020 रोजी मध्यरात्री फोडून आतील सीसीटीव्हीचे 19 इंची स्क्रीन (किं.अं. 6,500/-रु.) चोरुन नेला आहे. अशा मजकुराच्या धनंजय घोळवे यांच्या फिर्यादीवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अन्वये गुन्हा दि. 09.08.2020 रोजी नोंदवला आहे.


तुळजापूर: आरटीओ पथकाने भारत पेट्रोलीयम ट्रकवर कारवाई करुन तो एसटी बस डेपो, तुळजापूर येथे लावला होता. त्या ट्रकच्या डिझेल टाकीचा कोयंडा काढून टाकीतील 35 लि. डिझेल चोरुन नेत असतांना शरद दत्तु चव्हाण, रा. कावलदरा, ता. उस्मानाबाद हा दि. 09.08.2020 रोजी 16.00 वा.सु. बस डेपो, अधीक्षक- रोहीत सुरेश कोणाळे यांना आढळला. यावरुन रोहीत कोणाळे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा दि. 09.08.2020 रोजी नोंदवला आहे.


उस्मानाबाद -  नसरीन मोसिन शेख, रा. खाजानगर, उस्मानाबाद या दि. 10.08.2020 रोजी 14.30 वा. सु. देशपांडे स्टँड, उस्मानाबाद येथे होत्या. यावेळी त्यांच्या पर्समधील सॅमसंग जे7 मोबाईल फोन (किं.अं. 9,000/-रु.) मिनाक्षी उमेश भोसले, रा. जुना बस डेपो, उस्मानाबाद यांनी चोरुन नेला आहे. अशा मजकुराच्या नसरीन शेख यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मिनाक्षी भोसले यांच्याविरुध्द भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

  उस्मानाबाद -  दत्तात्रय दगडोबा गवळी, रा. मारवाड गल्ली, उस्मानाबाद यांच्या मौजे खानापूर शेत गट क्र. 125 मधील खोलीचा कडी- कोयंडा 1) कुंदन पवार 2) दादा, दोघे रा. हातलाई परिसर व त्यांच्या सोबत अन्य 2 अनोळखी व्यक्ती अशा चौघांनी दि. 10.08.2020 रोजी 03.00 वा. सु. तोडून आतील 4 शेळ्या व 1 बोकड (एकुण किं.अं. 45,000/-रु.) चोरुन नेले आहेत. अशा मजकुराच्या दत्तात्रय गवळी यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन संबंधीत चौघा व्यक्तींविरुध्द भा.दं.सं. कलम- 457, 380, 34 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

No comments