Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात अवैध मद्य विरोधी 8 कारवाया
पोलीस ठाणे, तुळजापूर: सतीश महादेव जाधव, रा. खंडाळा, ता. तुळजापूर हा दि. 31.07.2020 रोजी मौजे कसई येथील ‘हॉटेल विराज’ समोरील रस्त्यावर दारुचा अवैध व्यवसाय करण्याच्या उद्देशाने विदेशी दारुच्या 18 बाटल्या (किं.अं. 2,970/-रु.) कब्जात बाळगला असतांना पो.ठा. तुळजापूर च्या पथकास आढळला.

पोलीस ठाणे, लोहारा: मोताबाई हारीकन राठोड, रा. अनंदनगर तांडा, खेड, ता. लोहारा या दि. 31.07.2020 रोजी अनंदनगर तांडा, खेड येथे दारुचा अवैध व्यवसाय करण्याच्या उद्देशाने देशी दारुच्या 5 बाटल्या (किं.अं. 1,082/-रु.) कब्जात बाळगल्या असतांना पो.ठा. लोहारा च्या पथकास आढळल्या.

स्थानिक गुन्हे शाखा: अंगद अक्षत दिलपाक, रा. कुंभारी, ता. तुळजापूर हा दि. 31.07.2020 रोजी मौजे कुंभारी येथे कुंभारी- माळुंब्रा रास्त्यालगत दारुचा विनापरवाना विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने देशी दारुच्या 96 बाटल्या (किं.अं. 7,680/-रु.) कब्जात बाळगला असतांना स्था.गु.शा. च्या पथकास आढळला. यावरुन त्याच्याविरुध्द पो.ठा. तुळजापूर येथे म.दा.का. कायदा अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


पोलीस ठाणे, बेंबळी: सचिन महादेव कोळगे, रा. केशेगांव, ता. उस्मानाबाद हा दि. 01.08.2020 रोजी केशेगांव- आंबेवाडी रस्त्यावरील ‘मयुर ढाबा’ येथे अवैध मद्य विक्री करण्याच्या उद्देशाने देशी- विदेशी दारुच्या 59 बाटल्या (किं.अं. 4,146/-रु.) बाळगला असतांना पो.ठा. बेंबळी च्या पथकास आढळला.

पोलीस ठाणे, ढोकी: 1)पंकज दादाराव सिरसाट, रा. आरणी 2)मच्छिंद्र जालिंदर राउत, रा. तेर, ता. उस्मानाबाद हे दोघे दि. 31.07.2020 रोजी मौजे वानेवाडी रस्त्यालगत असलेल्या अनुक्रमे ‘वाय हॉटेल’ व ‘राजेश्वरी ढाबा’ येथे दारुचा विनापरवाना विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने एकत्रीत देशी- विदेशी दारुच्या 50 बाटल्या (किं.अं. 2,776/-रु.) कब्जात बाळगले असतांना पो.ठा. ढोकी च्या पथकास आढळले.

पोलीस ठाणे, मुरुम: अनिल दिनकर मिसाळ, रा. आष्टामोड, ता. लोहारा हा दि. 31.07.2020 रोजी मौजे दस्तापूर येथील स्वत:च्या दुकाना समोर दारुचा विनापरवाना विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने देशी दारुच्या 5 बाटल्या (किं.अं. 520/-रु.) कब्जात बाळगाला असतांना पो.ठा. मुरुम च्या पथकास आढळला.

पोलीस ठाणे, उमरगा: आबु गोविंद राठोड, रा. पळसगांव तांडा, ता. उमरगा हा दि. 01.08.2020 रोजी गुंजोटी- औराद रस्त्याचे बाजूस दारुचा अवैध विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने रबरी नळी मध्ये 30 लि. गावठी दारु (किं.अं. 1,800/-रु.) बाळगला असतांना पो.ठा. उमरगा च्या पथकास आढळला.

पोलीस ठाणे, परंडा: सुवर्णा मोहन पवार, रा. आसु, ता. परंडा या दि. 01.08.2020 रोजी आपल्या राहत्या घरा लगत दारुचा अवैध विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने 5 लि. गावठी दारु (किं.अं. 350/-रु.) कब्जात बाळगल्या असतांना पो.ठा. परंडा च्या पथकास आढळल्या.

       वरील सर्व अवैध मद्य छाप्यातील आरोपींविरुध्द संबंधीत पो.ठा. येथे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

3 comments

Dilawar shaikh said...

dilwar.shaikh7786@gmail.com

Dilawar shaikh said...

dilwar.shaikh7786@gmail.com

Dilawar shaikh said...

dilwar.shaikh7786@gmail.com