Header Ads

उस्मानाबाद : कोरोना योध्दे असलेल्या पोलीसांची रॅपीड ॲन्टीजेन तपासणीउस्मानाबाद -  कोविड- 19 चा संसर्गास अटकाव व्हावा या उद्देशाने जिल्हाभरात तपासणी नाके, प्रतिबंधीत क्षेत्रे, इस्पीतळ बंदोबस्त याकामी उस्मानाबाद पोलीस दलाचे अधिकारी- कर्मचारी व गृहरक्षक दलाचे जवान अहोरात्र तैनात आहेत. 

त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणी व शाखा, पोलीस कार्यालये येथे असणाऱ्या सर्व पोलीसांची रॅपीड ॲन्टीजेन तपासणी करण्यात येत आहे. यात कोविड- 19 बाधीत आढळल्यास त्यांच्या उपचाराकरीता तसेच क्वारंटाईन कक्षा करीता तुळजापूर येथील साप्ताहीक बाजार परिसरात असणाऱ्या मंदीर संस्थानच्या भक्त निवास ईमारती मधील तिसरा मजला राखीव ठेवण्यात आला आहे. तेथे त्यांना आवश्यक सुविधा पुरवण्याकरीता वैद्यकीय अधिकारी, पोलीस कर्मचारी नेमण्यात आले आहेत. 


आज पर्यंत उस्मानाबाद पोलीस दलातील 2 अधिकारी, 10 पोलीस कर्मचारी व 2 पोलीस कुटूंब सदस्य कोविड- 19 मुक्त झाले असुन एक पोलीस कर्मचारी मयत झाला आहे. सध्या 3 पोलीस अधिकारी, 31 पोलीस कर्मचारी, 6 कुटूंबीय व 2 गृहरक्षक दल जवान असे उपचार घेत आहेत.


नाकाबंदी दरम्यान 222 कारवाया- 64,600 ₹ ‘तडजोड शुल्क प्राप्त

उस्मानाबाद कोविड- 19 च्या प्रसारास प्रतिबंध व्हावा या उद्देशाने विविध मनाई आदेश लागू आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील 18 पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील महत्वाच्या रस्त्यांवर वाहतुक शाखेच्या सहकार्याने दि. 10.08.2020 रोजी नाकाबंदी करण्यात आली. नाकाबंदी दरम्यान मोटार वाहन कायदा अंतर्गत 222 कारवाया करण्यात आल्या असुन त्यातून 64,600 ₹ ‘तडजोड शुल्क’ प्राप्त झाले आहे.मनाई आदेशांचे उल्लंघन 29 पोलीस कारवायांत 6,600/-रु. दंड वसुल
उस्मानाबाद जिल्हा: कोविड- 19 संबंधीच्या मनाई आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द उस्मानाबाद पोलीस दलाने दि. 10.08.2020 रोजी जिल्हाभरात खालील प्रमाणे दंडात्मक कारवाया केल्या आहेत.
1)सार्वजनिक स्थळी थुंकणे: 21 कारवायांत- 3,200/- रु. दंड प्राप्त.
2)सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तीत सुरक्षीत अंतर न राखणे: 8 कारवायांत 3,400/-रु. दंड प्राप्त.

No comments