Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल आंबी: महसुल प्रशासनाने 20 ब्रास अवैध वाळु (गौण खनिज) जप्त करुन मौजे आनाळा, ता. परंडा येथील तलाठी कार्यालय परिसरात ठेवली होती. त्यातील 13 ब्रास वाळू किं. 41,587/-रु. ही चोरीस गेल्याचे तलाठी- मोनिका मसुडगे यांना दि. 17.08.2020 रोजी लक्षात आले. यावरुन तलाठी- मसुडगे यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा दि. 21.08.2020 रोजी नोंदवला आहे.


उस्मानाबाद (ग्रा.): प्रदीप जाधव, रा. चिलवडी, ता. उस्मानाबाद यांनी घरासमोर ठेवलेली हिरो होंडा स्प्लेंडर मो.सा. क्र. एम.एच. 13 एए 1598 ही दि. 19.08.2020 रोजी मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या प्रदीप जाधव यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा दि. 21.08.2020 रोजी नोंदवला आहे.


 उस्मानाबाद (ग्रा.): अमोल बिरंजे, रा. अंबेजवळगा, ता. उस्मानाबाद यांच्या शेतातील पत्रा शेडचे कुलूप अज्ञात चोरट्याने दि. 20.08.2020 रोजी मध्यरात्री तोडून आतील प्रत्येकी 50 कि.ग्रॅ. ज्वारीची 3 पोती, 65 कि.ग्रॅ. गव्हाचे 1 पोते चोरुन नेले. अशा मजकुराच्या अमोल बिरंजे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 461, 380 अन्वये गुन्हा दि. 21.08.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments