Header Ads

हरवलेले 10 स्मार्टफोन शोधुन मुळ मालकांस परत
उस्मानाबाद  मोबाईल फोन हरवल्या संदर्भात जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांत अनेक तक्रारी दाखल आहेत. त्या मोबाईल फोनचा ऑनलाईन शोध सायबर पोलीस ठाण्या मार्फत निरंतर घेतला जातो. अशाच प्रकरणातील 10 स्मार्टफोन हे इतरत्र वापरात असल्याचे सायबर पोलीसांच्या निदर्शनास आले. 

या मोबाईल फोन वापरणाऱ्या व्यक्तींची माहिती स्थानिक गुन्हे शाखा यांना पुरवण्यात आली. त्यावर स्था.गु.शा. च्या पथकाने ते फोन वापरकर्त्यांशी संपर्क साधुन त्यांच्या ताब्यातून ते 10 स्मार्टफोन (एकुण किं.अं. 1,93,000 ₹) जप्त केले. आज दि. 24.08.2020 रोजी पोलीस मुख्यालयातील कार्यक्रमात मा. पोलीस अधीक्षक श्री. राज तिलक रौशन व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. संदीप पालवे यांच्या हस्ते हे 10 स्मार्टफोन मुळ मालकांना परत करण्यात आले. यावेळी स्था.गु.शा. चे पो.नि. श्री दगुभाई शेख, सायबर पो.ठा. चे सपोनि- श्री सचिन पंडीत यांच्यासह स्मार्टफोन मालक- अशिफ शेख, रितेश कांबळे, अंगद सुतार, रुपेश घरबुडवे, शन्नो शेख, शुभम कोळगे, लक्ष्मण तिंडे, अमोल कुलकर्णी असे हजर होते. आपले स्मार्टफोन परत मिळाल्याने त्यांनी उस्मानाबाद पोलीसांचे आभार व्यक्त केले आहेत.

मोबाईल फोन शोध मोहिम सायबर पो.ठा. उस्मानाबादचे सपोनि श्री. सचिन पंडीत, स्था.गु.शा. चे पोहेकॉ- किशोर रोकडे, पोना- दिपक लाव्हरेपाटील, पोकॉ- पांडुरंग सावंत, बलदेव ठाकुर, अशोक कदम, मनोज मोरे यांच्या पथकाने पार पाडली आहे.

No comments