Header Ads

तुळजापूर - अल्पवयीन मुलीचे अपहरण


तुळजापूर: शौचास जाउन येते असे कुटूंबीयांना सांगुण एक 16 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) ही दि. 18.08.2020 रोजी सायंकाळी घराबाहेर पडली परंतु ती घरी परतली नाही. यावर कुटूंबीयांनी तीचा शोध घेतला असता काहीही उपयुक्त माहिती मिळाली नाही. यावरुन तीचे अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी अपहरण केले असावे. अशा मजकुराच्या अपहृत मुलीच्या वडीलांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363 अन्वये गुन्हा दि. 20.08.2020 रोजी नोंदवला आहे. 

अपघात

 तुळजापूर: हंगरगा फाटा येथे दि. 17.08.2020 रोजी 15.00 वा. सु. इनोवा कार क्र. एम.एच. 20 एफपी 1110 च्या चालकाने पुढील वाहन ओलांडून पुढे जाण्याच्या प्रयत्नात प्रकाश जाधव वय 49 वर्षे, रा. गंधोरा, यांच्या मो.सा. क्र. एम.एच. 25 एआर 7091 ला धक्का दिला. या धक्क्याने प्रकाश जाधव मो.सा. वरुन खाली पडुन त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत होउन मयत झाले. अशा मजकुराच्या राम प्रकाश जाधव (मयताचा मुलगा) यांनी दि. 20.08.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 


No comments