Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल

 नळदुर्ग: कलाय्या महादेव स्वामी, रा. इटकळ, ता. तुळजापूर यांच्या राहत्या घराचा कडी-कोयंडा अज्ञात चोरट्याने दि. 16.08.2020 रोजी मध्यरात्री तोडून घरातील अंदाजे 17 ग्रॅम सोन्याचे दागिने, विवो व सॅमसंग कंपनीचे असे दोन मोबाईल फोन व रोख रक्कम 19,300/-रु. असा एकत्रीत 68,900/-रु. माल चोरुन नेला आहे. अशा मजकुराच्या कलाय्या स्वामी यांनी दि. 16.08.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 उस्मानाबाद (श.): नितीन फुलचंद फंड, रा. रायबानगल्ली, उस्मानाबाद यांच्या उस्मानाबाद येथील जुन्या कन्या शाळेसमोरील ‘नितीन फार्मा & सर्जीकेअर’ या दुकानाचे कुलूप अज्ञात चोरट्याने दि. 15.08.2020 रोजी मध्यरात्री तोडून आतील आय- 5 कॉम्प्युटर सीपीयु व रोख रक्कम 38,000/-रु. चोरुन नेले आहेत. अशा मजकुराच्या नितीन फंड यांनी दि. 16.08.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


 वाशी: उध्दव मोहनराव आखाडे, रा. पारगांव, ता. वाशी यांनी त्यांची हिरो एचएफ डिलक्स मो.सा. क्र. एम.एच. 25 एएम 6805 ही राहत्या घरा समोर लावलेली व भाऊबंद- प्रभाकर आखाडे यांच्या घरा समोरील त्यांच्या कारमधुन सॅमसंग ए- 51 मोबाईल फोन व रोख रक्कम 1,100/-रु. चा माल अज्ञात चोरट्याने दि. 15.08.2020 रोजी मध्यरात्री चोरुन नेला आहे. अशा मजकुराच्या उध्दव आखाडे यांनी दि. 16.08.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

No comments