Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात जुगार आणि अवैध मद्य विरोधी कारवाया
जुगार विरोधी कारवाया 

पोलीस ठाणे, उमरगा: विनोद फुलचंद शिंदे, रा. उमरगा हा दि. 14.08.2020 रोजी बिर्याणी गल्ली, उमरगा येथील रस्त्यावर कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह रोख रक्कम 730/-रु. बाळगलेला तर त्याच दिवशी खंडाप्पा तुकाराम बडुरे, रा. कुन्हाळी, ता. उमरगा हा गावातच कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह रोख रक्कम 485/-रु. बाळगलेला पो.ठा. उमरगा यांच्या पथकास आढळला.

पोलीस ठाणे, तुळजापूर: राजकुमार कल्याण तेलगावकर, रा. कासार गल्ली, तुळजापूर हा दि. 14.08.2020 रोजी शिवाजी चौक, तुळजापूर येथे कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह रोख रक्कम 1,120/-रु. बाळगला असतांना उपविभागीय पोलीस अधिकारी, तुळजापूर यांच्या पथकास आढळला.
पोलीस ठाणे, लोहारा: शिवाजी श्रीरंग माने, रा. कानेगाव, ता. लोहारा हा दि. 14.08.2020 रोजी गावातील मारुती महाराज मंदीरासमोर कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह रोख रक्कम 1,360/-रु. बाळगला असतांना पो.ठा. लोहारा यांच्या पथकास आढळला.

       यावरुन वर नमूद 4 व्यक्तींविरुध्द म.जु.का. अंतर्गत संबंधीत पो.ठा. येथे 4 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.


अवैध मद्य विरोधी कारवाया

पोलीस ठाणे, तामलवाडी: बायडाबाई प्रकाश डोलारे, रा. सावरगाव, ता. तुळजापूर या दि. 15.08.2020 रोजी आपल्या राहत्या घरा समोर दारुचा अवैध विक्री वय्वसाय करण्यासाठी 50 लि. गावठी दारु (किं.अं. 1,600/-रु.) बाळगल्या असतांना पो.ठा. तामलवाडी यांच्या पथकास आढळल्या.

पोलीस ठाणे, लोहारा: बस्वराज विश्वनाथ तावसे, रा. जेवळी (उ,), ता. लोहारा हा दि. 14.08.2020 रोजी आपल्या राहत्या घरामागे दारुचा अवैध विक्री व्यवसाय करण्यासाठी 40 लि. गावठी दारु (किं.अं. 2,000/-रु.) बाळगला असतांना पो.ठा. लोहारा यांच्या पथकास आढळला.

पोलीस ठाणे, तुळजापूर: खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तुळजापूर पो.ठा. च्या पथकाने दि. 14.08.2020 रोजी तुळजापूर- अक्कलकोट रस्त्यावरील कंचेश्वर साखर कारखाण्याजवळ एक टाटा विस्टा क्र. एम.एच. 13 पीएन 2378 थांबवून तीची तपासणी केली. नमूद वाहनातून 1)परमेश्वर नागनाथ लांडगे 2)ज्ञानेश्वर चंडके 3)बस्वेश्वर लांडगे, तीघे रा. काडगाव, ता. तुळजापूर हे तीघे 180 मि.ली. च्या विदेशी दारुच्या 39 बाटल्या (किं.अं. 5,070/-रु.) विनापरवाना वाहतुक करत असतांना पथकास आढळले.

यावरुन वर नमूद 5 व्यक्तींविरुध्द म.दा.का. अंतर्गत संबंधीत पो.ठा. येथे 3 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

No comments