Header Ads

उस्मानाबाद : मारहाणीचे दोन गुन्हे दाखल ढोकी: विमल ग्यानदेव जाधव, रा. जागजी, ता. उस्मानाबाद या दि. 07.08.2020 रोजी 17.00 वा. सु. आपल्या घरा समोरील ओट्यावर बसल्या होत्या. यावेळी गल्लीतीलच- युवराज संताराम राठोड याने पुर्वीच्या भांडणावरुन विमल जाधव यांना शिवीगाळ करुन कुऱ्हाडीने, काठीने मारहाण केली. यात विमल यांचा उजवा हात मोडला. तसेच विमल यांचा बचाव करण्यास आलेल्या मुलगी- अनिता, सुन- अर्चना यांनाही युवराज राठोड याने शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. अशा मजकुराच्या विमल जाधव यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या निवेदनावरुन युवराज याच्याविरुध्द गुन्हा दि. 08.08.2020 रोजी नोंदवला आहे.

उस्मानाबाद : 1) अमोल बाबुशा सुर्यवंशी 2) बबलु चंद्रकांत सुर्यवंशी 3)खंडेश्वर सुर्यवंशी 4) चंद्रकांत सुर्यवंशी, सर्व रा. सांजा, उस्मानाबाद यांनी निर्मला पांडुरंग अनभुले, रा. सांजा शिवार यांना दि. 06.08.2020 रोजी 16.00 वा. सु. सांजा शेत शिवारात शेतजमीनीच्या कारणावरुन लोखंडी गज, काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच निर्मला यांचा बचाव करण्यास आलेल्या त्यांच्या सुनेलाही शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या निर्मला अनभुले यांच्या फिर्यादीवरुन नमूद चौघा व्यक्तीविरुध्द गुन्हा दि. 08.08.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments